फीफा वर्ल्डकपच्या नॉकआऊट समन्यांमध्ये 19 वर्षीय कीलियन एम्बापेने उत्तम कामगिरी केली आहे. त्याने दोन जबरदस्त गोल केले आहेत. अर्जेंंटीना आणि फ्रान्सदरम्यान रंगलेल्या समन्यात फ्रान्सने 4तर अर्जेंटीना ने 3 गोल केले. ( फोटो : IANS)
ब्राजीलचा महान खेळाडू पेले यांंनी 19 व्या वर्ल्डकपमध्ये 2 गोल करणारे एकमेव खेळाडू होते. आता एम्बापेने त्यांची बरोबरी केली.
फ्रान्सच्या 19 वर्षीय कीलियन एम्बापेच्या दमदार कामगिरीमुळे जगभरातील फूटबॉल चाहत्यांचे त्याने लक्ष वेधून घेतले आहे. अटीतटीच्या सामन्यामध्ये 64 आणि 68 व्या मिनिटाला त्याने दमदार गोल केलेत.
पेलेशी झालेल्या बरोबरीनंतर कीलियन एम्बापेने आनंद व्यक्त केला आहे. पेलेसारख्या महान खेळाडूच्या रेकॉर्डची बरोबरी करणं माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
फीफा वर्ल्ककपच्या क्वार्टर फायनलमध्ये फ्रान्स आणि उरूग्वेदरम्यान सामना रंगणार आहे. फीफा वर्ल्डकप मध्ये पहिल्यांंदा फ्रान्सने अर्जेंटीनावर मात केली आहे.