PHOTOS

La Tomatina 2024: सारं शहर टोमॅटोने आबादुबी खेळतं तेव्हा...; जाणून घ्या रंजक गोष्टी

La Tomatina 2024 Festival: नुसता चिखल... तोही टोमॅटोच्या रसाचा.... संपूर्ण जगात कुतूहलाचा विषय ठरलेल्या आणि नुकत्याच पार पडलेल्या या फेस्टीव्हलचे फोटो पाहिले का?  La Tomatina 2024 फेस्टीव्हलच्या निमित्तानं स्पेनमध्ये हजारोंच्या संख्येनं उत्साही मंडळींनी हजेरी लावली आणि एकच कल्ला केल्याचं पाहायला मिळालं. 

 

Advertisement
1/7
La Tomatina 2024
La Tomatina 2024

La Tomatina 2024 : संपूर्ण जगात आकर्षणाचा विषय ठरलेला आणि अनेक रंजक गोष्टींमुळं कायम लक्ष वेधणारा असा स्पेनमधील ला टोमॅटिना फेस्टीव्हल नुकताच पार पडला. 

 

2/7
व्हिडीओ आणि फोटो
व्हिडीओ आणि फोटो

या फेस्टीव्हलचे व्हिडीओ आणि फोटो नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले असून, इथं उपस्थित असणारी मंडळी धमाल करताना दिसत आहेत. एकमेकांवर चक्क टोमॅटो मारत या टोमॅटोच्याच चिखलात लोळत स्पेनमध्ये ही आगळीवेळी रंगपंचमीच साजरा करण्यात आली. 

3/7
नियम
नियम

टोमॅटो फेकून मारताना तो दुसऱ्या व्यक्तीला जोरात लागू नये यासाठी आधी हातानं दाबून त्यानंतरच मारला जातो. जेणेकरून या फेस्टीव्हलमध्ये आनंदाला गालबोट लागणार नाही. 

4/7
स्पेन
स्पेन

ऑगस्ट महिन्यातील अखेरच्या बुधावारी स्पेनमध्ये दरवर्षी हा फेस्टीव्हल पार पडतो आणि त्यासाठी जगभरातील पर्यटकांची हजेरी असते. हजारो टन टोमॅटो या फेस्टीव्हलसाठी वापरले जातात. 

5/7
145000 किलो टोमॅटो
 145000 किलो टोमॅटो

अधिकृत आकडेवारीनुसार या फेस्टीव्हलसाठी साधारण 145000 किलो टोमॅटो वापरले जातात आणि आश्चर्याची बाब म्हणजे या टोमॅटोंची लागवडही खास याच फेस्टीव्हलसाठी केली जाते. 

 

6/7
टोमॅटो
टोमॅटो

या फेस्टीव्हलसाठी वापरात येणारे टोमॅटो खाण्यायोग्य नसून, ते फक्त या फेस्टीव्हसाठीच वापरले जातात, जेणेकरून अन्नाची नासाडी होणार नाही. 

7/7
फेस्टीव्हल
फेस्टीव्हल

फेस्टीव्हलमुळं इथं रस्तेच्या रस्ते टोमॅटोच्या चिखलाना माखतात. पण, तरीही तितक्याच वेगानं हा चिखल स्वच्छही केला जातो. कमाल गोष्ट म्हणजे या टोमॅटोच्या चिखलामुळं आणि रसातील आम्लयुक्त घटकांमुळे रस्तेही स्वच्छ होतात. (सर्व छायाचित्र सौजन्य- रॉयटर्स)





Read More