PHOTOS

'त्या' लाडक्या बहिणी अडकल्या! पै अन् पै वसूल करणार सरकार; थेट फडणवीसांचे आदेश, 'कोणतीही..'

Maharashtra Ladki Bahin Yojana Updates: राज्यातील लोकप्रिय योजना असलेल्या 'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे. नेमकं ते काय म्हणालेत, कोणाकडून पैसे वसूल केले जाणार जाणून घेऊयात...

Advertisement
1/11

केवळ महिलाच नाही तर त्यांच्या घरातील पुरुषांचंही टेन्शन वाढवणारी बातमी 'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात पुढे आली आहे. नेमकं काय म्हटलंय सरकारने जाणून घ्या सविस्तरपणे....

2/11
मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद
मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद

महाराष्ट्र शासनाच्या 'लाडकी बहीण' योजनेचा फायदा पुरुषांनीही घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर त्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावरुन थेट भाष्य केलं.

 

3/11
बैठकीत घडलं काय?
बैठकीत घडलं काय?

या पुरुषांवर कारवाई करण्याबरोबरच सरकारच्या सदर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या काही महिलांकडूनही आतापर्यंत देण्यात आलेले पैसे वसूल केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नेमक्या या महिला आहेत कोण आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत नक्की काय घडलं? हे जाणून घेऊयात...

 

4/11
कोणती बाब गंभीर असल्याचं म्हणाले फडणवीस?
कोणती बाब गंभीर असल्याचं म्हणाले फडणवीस?

स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरुषांनी 'लाडकी बहीण' योजनाचा लाभ घेतल्याच्या बातमीची दखल घेत, खरोखरच या योजनेअंतर्गत पुरुषांनी पैसे घेत सरकारची फसवणूक केली असेल तर ही गंभीर बाब असल्याचं मत मांडलं. 

 

5/11
फडणवीसांनी काय आदेश दिले?
फडणवीसांनी काय आदेश दिले?

14 हजारांहून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर फडणवीसांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. 

 

6/11
कोणत्या गोष्टीची काळजी घेण्यासा मुख्यमंत्र्यांचा सल्ला?
कोणत्या गोष्टीची काळजी घेण्यासा मुख्यमंत्र्यांचा सल्ला?

मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहता कामा नये. मात्र त्याचवेळी अपात्र लोक याचा फायदा घेणार नाही याची काळजी घेतली जावी, असे निर्देशही दिलेले.

 

7/11
मुख्यमंत्र्यांना काय माहिती देण्यात आली?
मुख्यमंत्र्यांना काय माहिती देण्यात आली?

याचसंदर्भात राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी या योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्यात आली असून आतापर्यंत अपात्रांसंदर्भात काय कारवाई केली याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. 

 

8/11
त्या 26 लाख महिला अपात्र?
त्या 26 लाख महिला अपात्र?

सदर बैठकीनंतर अदिती तटकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 26 लाख लाभार्थी महिलांचा डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिला आहे. आता त्यामधील नेमक्या अपात्र महिला किती याची छाननी केली जाणार आहे. सर्व 26 लाख महिला अपात्र ठरल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं अदिती तटकरेंनी सांगितलं.

 

9/11
कोणाकडून होणार वसुली?
कोणाकडून होणार वसुली?

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी महिलांनी घेतल्याचं आढळून आल्यास त्यांच्याकडून वसुली केली जाईल असं सांगितलं आहे.

 

10/11
या इशाऱ्याचा नेमका अर्थ काय?
या इशाऱ्याचा नेमका अर्थ काय?

म्हणजेच सरकारी कर्मचारी असूनही आतापर्यंत जर या योजनेअंतर्गत कोणत्याही महिले पैसे घेतले असतील तर तिला हे पैसे परत करावे लागणार आहेत, हे अदिती तटकेरेंच्या इशाऱ्यावरुन स्पष्ट होत आहे. आता ही रक्कम परत करताना काही दंड आकारला जाणार का हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

 

11/11
मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या आधीच काय इशारा दिलेला?
मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या आधीच काय इशारा दिलेला?

सरकारी कर्मचारी महिलांनी नियमबाह्य लाभ घेतला असल्यास वसुली केली जाईल असं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याआधीही स्पष्ट केलं आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक, सौजन्य संबंधित नेत्यांच्या सोशल मीडियावरुन साभार)

 





Read More