PHOTOS

लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांनी 5 वर्षात व्हाल लखपती! कसं ते समजून घ्या

महाराष्ट्रात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. आतापर्यंत राज्यातील 80 लाख महिलांच्या खात्यात याची रक्कम आली आहे. या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात.

Advertisement
1/9
लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांनी 5 वर्षात व्हाल लखपती! कसं ते समजून घ्या
लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांनी 5 वर्षात व्हाल लखपती! कसं ते समजून घ्या

Ladki Bahin Yojana:महाराष्ट्रात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. आतापर्यंत राज्यातील 80 लाख महिलांच्या खात्यात याची रक्कम आली आहे. या योजनेत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात.

2/9
महिलांच्या खात्यात रक्कम जमा
महिलांच्या खात्यात रक्कम जमा

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला 32 लाख महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे 3 हजार रुपये पाठवण्यात आले.रक्षाबंधनच्या आधी सर्व पात्र महिलांना ही रक्कम येईल,अशी माहिती सरकारने दिली.

3/9
देशभरात या योजनेचे कौतुक
देशभरात या योजनेचे कौतुक

मध्य प्रदेश सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी ही योजना यशस्वीपणे राबवली.देशभरात या योजनेचे कौतुक झाले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला. 

4/9
योजना निरंतर
योजना निरंतर

या योजनेचा लाभ 5 वर्षांसाठी मिळणार आहे. असे असले तरी  ही योजना ठराविक काळासाठी नसेल तर निरंतर असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 

5/9
सोप्या भाषेत समजून घेऊया.
 सोप्या भाषेत समजून घेऊया.

या 1500 रुपयांतून तुम्ही 5 वर्षात लखपती होऊ शकता, हे तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसेल का? आपण यामागचं गणित सोप्या भाषेत समजून घेऊया. 

6/9
चक्रवाढ व्याजाचा फायदा
चक्रवाढ व्याजाचा फायदा

तुमच्या खात्यात दरमहा येणाऱ्या 1500 रुपयांची SIP करा. यामध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळू शकतो. 

7/9
5 वर्षात 90 हजार रक्कम
 5 वर्षात 90 हजार रक्कम

दरमहा 1500 रुपये जमा केल्यास एका वर्षात तुमचे 18 हजार रुपये जमा होतात. म्हणजेच 5 वर्षात तुमची गुंतवणुकीची रक्कम 90 हजार इतकी होते.

8/9
15 टक्के इतक व्याज
15 टक्के इतक व्याज

ही रक्कम तुम्ही सलग 5 वर्षे गुंतवा. यात कोणता खंड पडू देऊ नका. या रक्कमेवर तुम्हाला 15 टक्के इतक व्याज मिळेल असं धरुया. 

9/9
1 लाख 31 हजार 223 रुपये इतकी रक्कम
 1 लाख 31 हजार 223 रुपये इतकी रक्कम

90 हजारच्या रक्कमेवर 15 टक्क्यांनुसार 1 लाख 31 हजार 223 रुपये इतकी रक्कम गोळा होईल. म्हणजेच आता मिळालेले 1500 रुपये तुम्हाला 5 वर्षात लखपती बनवून जातील.





Read More