PHOTOS

जगातील सर्वात महागडं घरं एका मराठी राजाने बांधलंय, अंबानींचा अँटिलियाही यापुढे फिका पडेल

जगातील सर्वात अलिशान घर कोणते हा प्रश्न विचारल्यावर तुमच्या मनात पहिलं उत्तर येते ते बकिंघम पॅलेस. पण तुमचं उत्तर चुकलंय. भारतातीलच एका राजाने जगातील सर्वात अलिशान राजवाडा बांधला आहे. 

Advertisement
1/7
जगातील सर्वात महागडं घरं एका मराठी राजाने बांधलंय, अंबानींचा अँटिलियाही यापुढे फिका पडेल
जगातील सर्वात महागडं घरं एका मराठी राजाने बांधलंय, अंबानींचा अँटिलियाही यापुढे फिका पडेल

बडोद्यातील लक्ष्मी विलास पॅलेस जगातील सर्वात मोठे खासगी निवासस्थान आहे. हा राजवाडा बकिंघम पॅलेसच्या 4 पट मोठे आहे. लक्ष्मी विलास पॅलेस हे रॉयल फॅमिली ऑफ बडोदा म्हणजेच गायकवाड घराण्याचे आहे. 

2/7

राजवाड्याच्या एका भागात रॉयल फॅमिली राहते तर दुसऱ्या भागात सर्वसामान्य जनतेसाठी संग्रहालय बनवण्यात आले आहे. जेणेकरुन सर्वसामान्य जनता राजमहाल पाहू शकतो. 

3/7

लक्ष्मी विलास पॅलेस 1890 साली गायकवाडचे महाराज सयाजीराव गायकवाड-III यांनी बांधला होता. सध्या या राजवाड्याची जबाबदारी महाराज समरजीत सिंह गायकवाड आणि त्यांची पत्नी महाराणी राधिका राजे गायकवाड यांच्याकडे आहे. ते कुटुंबासह या राजवाड्यात राहतात

4/7

समरजित सिंह गायकवाड या राजवाड्याचे मालक आहेत. मराठा साम्राज्याचे सरदार सयाजीराव गायकवाड यांनी 1890मध्ये हा राजवाडा बांधला होता. तेव्हा या बांधकामावर सुमारे 60 लाखांचा खर्च झाला होता. 

5/7

 2012 मध्ये वडिलांच्या निधनानंतर समरजीत सिंह गायकवाड महाराज बनले. 2013 पासून समरजीत सिंह गायकवाड या राजवाड्यात राहतात

6/7

 लक्ष्मी विलास पॅलेस 3,04,92,000 स्केअर फुटवर बांधण्यात आला आहे. हा राजवाडा बांधण्यासाठी 12 वर्ष लागले होते. संपूर्ण पॅलेसमध्ये 170 खोल्या असून इंडो सारासेनिक आर्किटेक्चरल शैलीत बांधकाम करण्यात आले आहे. 

7/7

समरजित सिंह यांच्या कुटुंबाला 20000 कोटींची संपत्ती आणि राजा रवी वर्मा यांच्या अनेक पेटिंग वारसाहक्क म्हणून मिळाल्या आहेत. या घराची किंमत जवळपास 25000 कोटींच्या आसपास आहे. 

 





Read More