PHOTOS

Lal Kitab : 'या' चमत्कारिक पुस्तकात खरंच दडलाय श्रीमंतीचा मंत्र?

अपयशाचा सामना करण्यासाठीचे सर्व उपाय एका चमत्कारिक पुस्तकात देण्यात आले आहेत. हे पुस्तक अनेकांच्या भाग्योदयाला हातभार लावतं. (Lal Kitab Upay)

Advertisement
1/5

'लाल किताब' अशा शब्दांत या चमत्कारिक पुस्तकाचा उल्लेख केला जातो. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार आर्थिक चणचण भासत असल्यास व्यक्तीनं हनुमान चालिसेचं पठण करावं. मंगळवारी मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन तिथं लाल रंगाचं वस्त्र अर्पण करावं. 

2/5

रोज पक्ष्यांना खायला घाला. असं केल्यास नकळत तुमच्या वाटेतील अडथळे दूर होतील. धर्म- शास्त्रामध्ये हे अतिशय शुभसूचक काम मानलं जातं. 

3/5

संकटं, आजारपण, अडथळे संपत नसल्यास तुम्ही घरातील कोणत्याही वाटीमध्ये तेल घेऊन ते शनिमंदिरात अर्पण करा. यासाठी कांस्याची वाटी वापरल्यास त्याचे परिणाम वेगानं दिसतील. 

 

4/5

गायीला दररोज चारा, चपाती- गुळ खायला घातल्यास याचाही फायदा होतो. घरात सुख- शांती नांदते

5/5

घरात फक्त शोभा वाढवण्यासाठी नव्हे, तर सकारात्मक परिणामांच्या अपेक्षेनंही Fish Tank ठेवला जातो. घरात फिश टँक असल्यास त्यामघ्ये 5  गोल्ड फिश आणि 1 ते 2 काळे मासे त्यात ठेवा. असं केल्यास तुमच्या घरातील संकट हे मासे त्यांच्यावर घेतात असं म्हटलं जातं. टँकमधील एखादा मासा मृत झाल्यास तो लगेचच काढून टाका आणि पुन्हा त्या रंगाचा मासा टँकमध्ये ठेवू नका. 

(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)





Read More