वर लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच...
Lalbaugcha Raja Visarjan: नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून असंख्य गणेशभक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. अखेरच्या दिवशीदेखील लालबागचा राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते.
मोठमोठे सेलिब्रिटी, राजकारणी सर्वजण लालबाग राजाच्या दरबारात हजेरी लावतात. दरम्यान, सकाळपासूनच लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांची विसर्जनासाठीची लगबग पाहायला मिळालीय. पण लालबागच्या राजाचे विसर्जन कसे आणि किती वाजता होते? याबद्दल जाणून घेऊया.
लालबागचा राजा विसर्जनासाठी बाहेर पडल्यानंतर राजाच्या विसर्जनासाठी गणेशभक्तांचा जनसागर लोटला आहे.दरवर्षीप्रमाणे ठरलेल्या मार्गानेच ही मिरवणूक निघणार आहे. संध्याकाळी लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर आगमन होईल आणि अरबी समुद्रातील विशेष तराफ्यावरून लालबागच्या राजाचं विसर्जन राजेशाही पद्धतीनं करण्यात येणार आहे.
पारंपारिक वेषातच भाविक या मिरवणुकीत भाग घेतात. यावेळी ढोलताशांचा दणादणाट... फटाक्यांची आतषबाजी...गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... चा जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात बाप्पाची मिरवणूक सुरू असते.
रात्री गिरवगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे आगमन होईल. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर पयानंतर समुद्रात 'लालबागच्या राजा' चे शाही विसर्जन करण्यात आले असून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात येतील.
यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने लालबागच्या राजाला (Lalbaugcha Raja ) खोल समुद्रात नेऊन निरोप दिला जातो. 22 ते 24 तासांनंतरही गणेशभक्तांच्या उत्साहात कमी झालेला दिसत नाही. लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात.
लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी मिरवणूक मार्गावर मुंबईकरांची अलोट गर्दी पाहायला मिळते. तब्बल 22 ते 24 तासांच्या उत्साहपूर्ण, जल्लोषात आणि ढोलताशांच्या दणदणाटात निघालेल्या मिरवणूकीनंतर लालबागच्या राजा गिरगाव समुद्राच्या दिशेने पुढे जात राहतो.
गिरगाव चौपाटीवर लाडक्या राजाला अखेरचा निरोप देण्यात येईल. समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात येते. त्यानंतर खास सजावट करण्यात आलेल्या तराफ्यावरून थाटामाटात लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात रवाना होते आणि खोल समुद्रात बाप्पाला निरोप देण्यात येतो.