Bank Fixed Deposit Interest Rate : हल्ली जवळपास सर्वच बँकांच्या व्याजदरात वाढ झाली आहे. पण, यातूनही नेमकी कोणती बँक किती व्याजदर देते हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? पाहा ही माहिती...
येस बँकेत सर्वसामान्यांसाठी एफडीवर 3.25 ते 7.50 टक्के इतकं व्याज मिळतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे प्रमाण 3.75 ते 8.25 टक्के इतकं आहे.
युनियन बँकेत सामान्य खातेधारकांना एफडीवर 3 ते 7 टक्के व्याज मिळतं. तर, ज्येष्ठांसाठी हे प्रमाण 3.50 ते 7.50 टक्के इतकं आहे.
कॅनरा बँकेत नागरिकांना एफडीवर 4 टक्के व्याज मिळतं. हे प्रमाण 7.25 टक्के व्याजदरापर्यंत असून, ज्येष्ठांसाठी कमाल व्याजदर 7.75 टक्के इतका आहे.
अॅक्सिस बँकेतही इतर बँकांप्रमाणे एफडीवर 3 ते 7.10 टक्के व्याज दिलं जातं. तर, ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत हे प्रमाण 3.50 ते 7.85 टक्के इतकं आहे.
सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकांपैकी एक असणाऱ्या PNB बँकेत एफडीवर 3.5 ते 7.25 टक्के व्याज दिलं जातं. तर, ज्येष्ठ नागरिकांना 4 ते 7.75 टक्के व्याज दिलं जातं.
icici बँकमध्ये एफडीवर 3 ते 7.10 टक्के व्याज दिलं जातं. तर, ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.75 टक्के व्याज दिलं जातं.
अनेकांच्याच पगाराची खाती असणाऱ्या HDFC या बँकेत एफडीवर सामान्य नागरिकांना 3 ते 7.25 टक्के व्याज दिलं जातं. तर, ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.75 टक्के व्याज मिळतं.
देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या SBI मघ्ये एफडीवर 3 ते 7.10 टक्के इतकं व्याज दिलं जातं. ज्येष्ट नागरिकांसाठी हा दर 3.50 ते 7.60 टक्के इतका आहे.