लावाचा हा फोन पूर्णपणे देशातच तयार केला आहे. या फोनचे नाव आहे प्राईम एक्स (PRIME X). दोन वर्षांच्या रिप्लेसमेंट व्हारंटीसहीत हा बाजारात लॉन्च करण्यात आला.
'डिझाईन इन इंडिया'च्या अंतर्गत बनवण्यात आलेल्या लावाचा हा पहिला फोन ऑक्टोबर २०१८ मध्ये लॉन्च करण्यात येईल. याची किंमत १४९९ रुपये आहे.
डिझाईन इन इंडिया प्लॅनसाठी लावाच्या डिझाईन टीनने चीनमध्ये एका वर्षात चांगले प्रशिक्षण दिले गेले. डिझाईन इन इंडिया हे देशात मोबाईल पार्ट्स बनवण्यासाठी टाकले गेलेले एक मोठे पाऊल आहे.
प्राईम एक्स आपल्या श्रेणीतील सर्व प्रतिस्पर्धीं उत्पादनांना मात देण्यास समर्थ ठरेल, असा लावाचा दावा आहे. याची ऑडिओ क्वॉलिटी देखील जबरदस्त आहे.
लावाने काही दिवसांपूर्वी झेड सीरीजचे चार नवे स्मार्टफोन्स लॉन्च केले. यात Z60, Z70, Z80 आणि Z90 यांचा समावेश आहे.