PHOTOS

भुवयांचा आकारच सांगतो मनातली गोष्ट; एका क्षणात ओळखता येईल समोरच्याचा स्वभाव

ter Test : समोरची व्यक्ती खरंच मनापासून चांगली आहे की त्या चेहऱ्यामागे दडलंय खूप काही.... जाणून घ्या भुवया कसं काय सांग...

Advertisement
1/7
सर्वसाधारण भुवया
सर्वसाधारण भुवया

जास्त लांब, लहान किंवा विरळ नसणाऱ्या, सर्वसाधारण आकार आणि दाटीच्या भुवया असणाऱ्या व्यक्ती सांस्कृतिक मूल्यांना महत्त्वं देणाऱ्या असतात. तर, लांबलचक भुवया असणाऱ्या व्यक्ती या समुहामध्ये रमणाऱ्या आणि सहजपणे इतरांमध्ये मिसळणाऱ्या असतात. काळजी वाटणाऱ्या व्यक्तीप्रती ही मंडळी जीव ओततात. 

 

2/7
लहान भुवया
लहान भुवया

लहान भुवया असणाऱ्या व्यक्तींना दुहेरी चेहऱ्याची लोकं पचत नाहीत. त्यांचे जवळचे मित्र फार कमी असतात. ते इतरांमध्ये तुलनेनं कमीच मिसळतात. तर, दाट भुवया असणाऱ्या व्यक्तींचा आत्मविश्वास दांडगा असतो. ते बहुतांशी तत्वनिष्ठ असतात. इतरांचा विचार न करता आणि इतरांचा स्वत:वर फार परिणाम होऊ न देता ही मंडळी आयुष्य जगतात. 

 

3/7
विरळ भुवया
विरळ भुवया

विरळ तरीही रेखीव भुवया असणाऱ्या व्यक्ती कमालीच्या समर्पक वृत्तीच्या असतात. ते उत्तम श्रोते असतात ज्यामुळं अतिशय सुरेखरित्या ते कोणत्याही वादावर तोडगा काढतात. उलटपक्षी उंच आणि रेखीव भुवया असणाऱ्या व्यक्ती कमालीच्या संवेदनशील असतात. विश्वास जिंकावा लागतो हेच त्यांचं ठाम मत. जोपर्यंत तुम्ही अशा व्यक्तींना व्यवस्थित ओळखत नाही तोपर्यंत ते तुम्हाला एककेंद्री वाटतात. 

 

4/7
काहीशा त्रिकोणी भुवया
काहीशा त्रिकोणी भुवया

ठळक त्रिकोणी आकार दिसणाऱ्या भुवयांच्या व्यक्तींना न सांगून आलेल्या परिस्थितीशी लढताना यश मिळतं. ही मंडळी उत्तम वक्ते, नेते ठरतात. पण, अनेकदा त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि कधीही अचानक व्यक्त होण्याची सवय त्यांना अडचणीत आणते. 

 

5/7
वर्तुळाकार भुवया
वर्तुळाकार भुवया

वर्तुळाकार भुवया असणाऱ्या व्यक्तींच्या अवतीभोवती त्यांच्या आवडीच्या व्यक्तींचा वावर असतो. ते स्वभावानं प्रामाणिक आणि इतरांची काळजी करणारे असतात. स्वत:आधी ते इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देतात. 

 

6/7
अतिविरळ भुवया
अतिविरळ भुवया

अतिशय विरळ भुवया असणाऱ्या व्यक्ती काहीशा लाजऱ्या आणि इतरांमध्ये तुलनेनं कमी मिसळणाऱ्या असतात. अनेकदा या व्यक्तींना स्वत:च्याच पात्रतेवर विश्वास नसतो. 

 

7/7
Queens भुवया
Queens भुवया

काही व्यक्तींच्या भुवया चेहऱ्यावर इतरांहून काहीशा उंचीवर असतात. अशा भुवयांना Queens eyebrows असंही म्हणतात. कमालीचं सौंदर्य या व्यक्तींच्या चेहऱ्यावरूनच झळकतं. 





Read More