Lipstick Hacks: दररोज कोणती लिपस्टिक लावायची आणि कोणती नाही असा गोंधळ सोडवण्यापेक्षा तुम्ही लिपस्टिकचे भन्नाट जुगाड करू शकता. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही लिपस्टिकचा नक्की कसा जुगाड करू शकता ज्याचा तुमच्या महिला सहकाऱ्यांना पत्ताच लागणार नाही.
ऑफिसला आपल्यालाही कायमच चांगला नट्टाफट्टा करून जाणे आवश्यक असते त्यामुळे महिला या बाबतीत चांगल्याच आग्रही असतात. अनेकदा कुठल्याही लिपस्टिक लावाव्यात असा प्रश्न अनेकांना पडतो.
त्यातून त्या कशा लावता येतील आणि त्यातूनही आपण सुंदर दिसू असे प्रश्नही अनेकादा महिलांना पडतात. परंतु असा गोंधळात राहण्यापेक्षा तुम्ही फटक्यात जुगाड करू शकता.
तुम्हाला जर एका एकाच रंगाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही लाईट किंवा पेस्टल रंगाच्या लिपस्टिक अधून मधून लावू शकता. आणि त्यावर हलका डार्क रंगाच्या लिपस्टिकचा शेड टाकू शकता.
त्यातून तुम्हाला जर का तुमचे ओठ अजून आकर्षक बनवायचे असतील तर तुम्ही शिमर कोटिंग लावू शकता. साध्या कुठल्याही रंगाच्या लिपस्टिकवर हे कोटिंग खुलून दिसते.
तुम्हाला जर का कोणत्या आऊटफिटवर कोणती लिपस्टिक लावावी किंवा अमुक एक लिपस्टिक आपल्याला सुट होत नाही असं वाटतं असेल तर तुम्ही एकाच शेडवरून विविध स्ट्रोक्स ट्राय करू शकता. जसे की कधी लाईट लावा तर कधी मध्यम.
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)