PHOTOS

7 क्रिकेटर्स ज्यांचा क्रिकेटच्या मैदानावर झालाय मृत्यू, एका भारतीय खेळाडूचाही समावेश

Cricketers Died on Field List: क्रिकेट हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. या खेळाने जगाला अनेक स्टार क्रिकेटर्स दिले. मात्र बऱ्याचदा क्रिकेटच्या मैदानावर अपघात होतात, ज्यामुळे खेळाडू जखमी होऊन बराचकाळ मैदानापासून दूर राहतात. तर सामन्यादरम्यान अपघात झाल्याने काही खेळाडूंचा मैदानात मृत्यू देखील झालाय. 

Advertisement
1/8

मैदानावर बॉल लागून मृत्यू झालेल्या  क्रिकेटर्सचा विषय निघाला की फिलिप ह्यूजचं नाव तोंडावर येतं. मात्र फिलिप ह्यूजचं नाही तर अनेक खेळाडूंनी क्रिकेटच्या मैदानावर आपले प्राण गमावले आहेत. यात एका भारतीय खेळाडूचा सुद्धा समावेश आहे. अशा 7 खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात. 

 

2/8
वसीम राजा :
वसीम राजा :

पाकिस्तानचा फलंदाज वसीम राजाने त्याच्या राष्ट्रीय संघाकडून 57 टेस्ट आणि 54 आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळले आहेत. त्याचं निधन 2006 मध्ये झालं असून त्याला इंग्लंड काउंटीमध्ये सरे क्रिकेट क्लबमध्ये खेळताना हृदयविकाराचा झटका आला होता. वसीम राजाचा भाऊ म्हणजेच माजी क्रिकेटर रमीज राजा हा सध्या कॉमेंट्री करताना दिसतोय. 

3/8
फिलिप ह्यूज :
फिलिप ह्यूज :

फिलिप ह्यूजच्या मृत्यूने क्रिकेट जगताला हेलावून सोडलं होतं. मैदानात बॉल लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. नोव्हेंबर 2014 मध्ये शेफील्ड शील्ड सामन्या दरम्यान सीन एबॉटने टाकलेला एक वेगवान बॉल त्याच्या मानेला लागला. ह्यूज मैदानावर कोसळला त्याला लगेचच रुग्णालयात नेण्यात आलं. पण फिलिप ह्यूजच्या डोक्यात फ्रॅक्चर झालं होतं. इंटर्नल ब्लीडिंग सुद्धा झाली होती. २ दिवसांनी अखेर त्याचं निधन झालं. 

 

4/8
रिचर्ड ब्यूमोंट :
रिचर्ड ब्यूमोंट :

इंग्लिश क्लब क्रिकेटर रिचर्ड ब्यूमोंटने 5 ऑगस्ट 2012 रोजी एस्टवुड बॅंक क्रिकेट क्लब विरुद्ध ५ विकेट घेतले होते. पण त्यानंतर ब्यूमोंटला हार्ट अटॅक आला आणि तो मैदानातच कोसळला. त्याला बर्मिंघमच्या क्वीन एलिजाबेथ रुग्णालयात नेण्यात आलं जिथे त्याला मृत घोषित केलं गेलं. 

5/8
रमन लांबा:
रमन लांबा:

1986-89 दरम्यान 4 टेस्ट, 32 वनडे सामन्यात रमन लांबाने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. रमन लांबाला ढाकामध्ये एका क्लब सामन्यादरम्यान  सिली-पॉइंटवर फिल्डिंगसाठी उभं केलं होतं. त्याने हेल्मेट घातलं नव्हतं. त्याच्या डोक्याला बॉल लागला आणि तो कोमात गेला. ३ दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. 

 

6/8
डॅरिन रॅंडल :
 डॅरिन रॅंडल :

 फिलिप ह्यूजच्या मृत्यूनंतर वर्षभराने पुन्हा एकदा अशीच घटना घडली ज्यात विकेटकिपर फलंदाज डॅरिन रॅंडलचा मृत्यू झाला. 27 ऑक्टवर 2013 रोजी पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात असताना बॉल  डॅरिन रॅंडलच्या डोक्याला लागली. यातच त्याचा मृत्यू सुद्धा झाला. 

7/8
इयान फोली:
इयान फोली:

इंग्लंडचा देशांतर्गत क्रिकेटर इयान फोलीचा मृत्यू सुद्धा मैदानात झाला. फोली 1993 मध्ये व्हाइटहेवन क्रिकेट क्लबसाठी फलंदाजी करत होता. यावेळी त्याच्या डोळ्याखाली बॉल लागला. त्याला डोळ्याच्या सर्जरीसाठी मैदानात दाखल करण्यात आले पण एनेस्थीसियामध्ये असताना फोलीला हृदयविकाराचा झटका आला. 

 

8/8
जुल्फिकार भट्टी :
 जुल्फिकार भट्टी :

पाकिस्तान क्लबचा क्रिकेटर जुल्फिकार भट्टी याचा सुद्धा मैदानात बॉल लागल्याने मृत्यू झाला. 2013 मध्ये मैदानात खेळताना बॉल लागल्याने जुल्फिकार भट्टीचा मृत्यू झाला, त्यावेळी जुल्फिकार भट्टी हा केवळ 22 वर्षांचा होता.  पुल शॉट खेळताना छातीवर बॉल लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आलं परंतु त्याचा मृत्यू झाला होता. 





Read More