PHOTOS

मासिक पाळीच्या रक्ताने काळ्या जादूचे आरोप ते निवडणूक प्रचार..; शेखर सुमनचं कंगनाबद्दलचं वक्तव्य चर्चेत

Shekhar Suman On Son's Ex-Girlfriend: शेखर सुमनने नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आपल्याला कालपर्यंत याची कल्पना नव्हती. जे काही घडून आलंय त्यासाठी मी देवाचे आभारी मानतो असं शेखर सुमने भाजपा प्रवेशानंतर म्हटलं. मात्र त्यानंतर पुत्राच्या पूर्वीच्या गर्लफ्रेण्डसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावरुन त्याने रंजक उत्तर दिलं. जाणून घ्या हा प्रश्न नेमका काय होता आणि त्याने काय उत्तर दिलं.

Advertisement
1/11

अभिनेता शेखर सुमन आणि अभिनेत्री कंगना राणौत आता एकाच राजकीय पक्षाचे सदस्य झाले आहेत. 'हिरामंडी'मुळे सध्या चर्चेत असलेल्या शेखर सुमन यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

2/11

अभिनेत्री कंगना राणौतने यापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला असून ती यंदाची लोकसभा निवडणूकही लढवत आहे.

3/11

हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना भाजपाच्या तिकिटीवर निवडणूक लढवत आहे.

4/11

कंगना ही शेखर सुमनच यांचा मुलगा अध्ययन सुमनची पूर्वीश्रमीची प्रेयसी होती. या दोघांचे काही काळ प्रेमसंबंध होते. मात्र नंतर त्या दोघांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला.

 

5/11

कंगना आणि अध्ययन सुमन हे दोघे 2008-09 दरम्यान एकमेकांना डेट करत होते.

6/11

कंगना आणि अध्ययन या दोघांनी 'राझ: द मिस्टी कंटीन्यूज' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. इथेच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

7/11

कंगना आणि अध्ययनचं ब्रेकअप झाल्यानंतर या बापलेकाच्या जोडीने कंगणाने अध्ययनवर काळी जादू केल्याचा विचित्र आरोपही केले होते. 2017 मध्ये अध्ययनने तर कंगनाने मासिक पाळीचं रक्त वापरुन आपल्यावर काळी जादू केल्याचा आरोप केलेला.

8/11

शेखर सुमन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्यावेळेस आयएएनएस या वृत्तसंस्थेनं त्यांना एक गोंधळात टाकणारा प्रश्न विचारला. या प्रश्नाचा संदर्भ कंगनाशी होता.

 

9/11

भूतकाळातील अनुभवांचा विचार केल्यास तुम्ही कंगनासाठी मंडीमध्ये प्रचार करायला जाणार का? असा प्रश्न शेखर सुमन यांना विचारण्यात आला.

 

10/11

प्रश्न ऐकताच शेखर सुमन यांनी, "जर बोलावलं तर का नाही जाणार? हे तर माझं कर्तव्य आणि हक्कही आहे," असं उत्तर दिलं.

 

11/11

भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेखर सुमन यांनी, "आम्ही जुना वाद धरुन ठेवलेला नाही. कुटुंबानेही नाही आणि अध्ययननेही नाही. आता याबद्दल विचार करणं काही कामाचं नाही. ती केवळ एक फेज होती. ते घडून गेलं आणि तेव्हाच संपलं," असं कंगनाबद्दलच्या प्रकरणाबद्दल म्हटलं होतं.





Read More