इंडिया आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या राहुल गांधी हे केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन लोकसभा निवडणूक लढवत होते.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आता स्पष्ट होऊ लागले आहेत. इंडिया आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे या दोन्ही मतदारसंघात चांगल्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांनी 28 हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने आघाडी घेतली. भाजपचे दिनेश प्रताप सिंग यांनी या विरोधात निवडणूक लढवली होती.
तर केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी ८० हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत.
राहुल गांधी यांचा जन्म 19 जून 1970 रोजी झाला. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाड मतदारसंघाचे नेतृत्व केले होते.
राहुल गांधी यांनी 2004 मध्ये सक्रीय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पहिली निवडणूक अमेठीमधून लढवली होती. त्यात त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 या मध्ये ते पुन्हा या मतदारसंघातून विजयी झाले.
पक्षाच्या राजकारणात आणि राष्ट्रीय सरकारमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. राहुल गांधी यांची 2013 मध्ये काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांनी यापूर्वी महासचिव म्हणून काम केले होते. यानंतर 16 डिसेंबर 2017 ते 3 जुलै 2019 या कालावधीत काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले.
2014 आणि 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी नेतृत्व केले होते. यानंतर 2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
राहुल गांधी यांनी जानेवारी 2024 मध्ये भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली . भारताच्या ईशान्येतील मणिपूर ते मुंबई असा प्रवास राहुल गांधींनी केला. राहुल गांधींनी 14 जानेवारी 2024 रोजी सुरु केलेला हा प्रवास 16 मार्च 2024 रोजी संपला.
यंदा त्यांनी अमेठीच्या ऐवजी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवली. तसेच पारंपारिक वायनाड मतदारसंघातही राहुल गांधींचे यश कायम असल्याचे दिसत आहे.