Lord Hanuman Birth Place: बाल हनुमानजींच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यातील सूर्याकडे झेप घेतलेली कथा लहानपणापासून आपण सगळ्यांनी ऐकली आहे. महाराष्ट्रातील 'या' डोंगरावरून अंजनीपुत्र हनुमानजींनी घेतली होती सूर्याकडे झेप
ती कथा अशी आहे की, लहानपणी झोपेतून उठल्यावर अंजनीपुत्र हनुमानजींना भूक लागली. तेव्हा त्यांना लाल पिवळा रंगाचे फळ दिसले. ते फळं नव्हते तर सूर्यदेव होते.
सूर्याला खाण्यासाठी बाल हनुमान हट्टाला पेटले आणि एका उंच डोंगरावरुन त्यांनी झेप घेतली, अशी आख्यायिका आहे.
तुम्हाला माहिती आहे का हे उंच डोंगर महाराष्ट्रात असून ते कुठे आहे ते?
हे उंच डोंगल नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी डोंगर आहे. हनुमान यांची आई अंजनी यांच्या नावावरुन या डोंगराचं नाव अंजनेरी पडलं अशी आख्यायिका आहे.
हनुमानजींचं हे जन्मस्थान पाहण्यासाठी नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून 20 कि. मी. अंतरावर एक अंजनेरी फाटा आहे.
हा फाटा ओलांडल्यानंतर अंजनेरी गावातून पायऱ्यांच्या वाटेने गडावर तुम्ही जाऊ शकता. या गडावर जाण्यासाठी दुसरा रस्ता म्हणजे मुळेगावकडूनही जाता येतो.
या गडावर चढताना रस्त्यात तुम्हाला जैनधर्मीय लेणी पाहिला मिळतात. इथे अंजनी मातेचं सुंदर मंदिर आहे. शिवाय आजही या डोंगरावर हनुमानजींचे पायांचे ठसे दिसतात.