PHOTOS

Diabetes रुग्णांचे मित्र आहेत Low Glycemic Index Foods, वाढवत नाहीत Blood Sugar

Low GI Foods For Diabetes : ग्लायसेमिक इंडेक्स डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर किंवा हानिकारक आहे की नाही हे दर्शविते. उच्च जीआय असलेले पदार्थ लवकर पचतात आणि शोषले जातात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, याउलट ज्या पदार्थांचे जीआय कमी असते ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जातात. जाणून घ्या, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे आणि त्या तुमच्या रक्तातील ग्लुकोजचे (Blood Sugar) प्रमाण वाढू देत नाहीत.

Advertisement
1/5

मसूर ही आपल्या दैनंदिन आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर आहेत. तसेच कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी-9 चा चांगला स्रोत देखील आहेत. त्याचे जीआय सुमारे 25 ते 30 आहे, ज्यामुळे ते निरोगी पदार्थांच्या यादीमध्ये समाविष्ट होते.

2/5

गाजराचे उत्पादन साधारणपणे हिवाळ्यात केले जाते.  परंतु गाजर हे वर्षभर बाजारात उपलब्ध असते, त्यात पोटॅशियम, बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. कमी जीआयमुळे ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते.

3/5

तसेच दूध हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. कारण त्यात पोषक तत्वांची कमतरता नसते. मात्र मधुमेही रुग्णांनी कमी फॅट दूध प्यावे. त्याचा GI कमी आहे. लक्षात ठेवा दुधात साखर मिसळू नये.

4/5

आपल्याला अनेकदा नाश्त्यात ओट्स खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यात फायबर आणि बीटा-ग्लुकन असते, त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो आणि त्याचवेळी, त्यात कॅलरीजचे प्रमाण नगण्य असते. 

5/5

राजमाची चव अनेकांना आकर्षित करते. परंतु तुम्हाला माहित आहे का की त्यात जीआय कमी असते. तसेच त्यात भरपूर फायबर आणि प्रथिने आहेत, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे आरोग्यदायी अन्न मानले जाते.  

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 





Read More