चंद्र ग्रहण यंदा गुरू पौर्णिमेच्या दिवशी आल्याने ते खास ठरणार आहे. हे ग्रहण सुमारे 3 तास 55 मिनिटं चालणार आहे.
यंदा गुरू पौर्णिमेला होणारे चंद्रग्रहण शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण आहे. 27 जुलैच्या रात्री 11 वाजून 54 मिनिटांंनी हे सुरू होईल. 28 जुलैच्या सकाळी 3 वाजून 5 मिनिटांनी चंद्रग्रहण संंपणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतककाळ हा दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे.
ग्रहणादरम्यान सूतक हा एक महत्त्वाचा काळ समजला जातो. त्यानुसार सूर्यग्रहणात सूतक काळ हा 12 तास आधी तर चंद्रग्रहणात सुतककाळ 9 तास आधी सुरू होतो. धार्मिक मान्यतांनुसार, ग्रहणादरम्यानच्या सुतककाळात नकारात्मक उर्जा असते. या काळात अनेकजण शुभ काम करणं टाळतात.
27 जुलै 2018 ला होणारे चंद्रग्रहण भारत, दक्षिण आफ्रिका, पश्चिम आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोपातून दिसणार आहे. 31 जानेवारी 2018 रोजी यंदाचे पहिले चंद्रग्रहण झाले. या प्रकाराला 'ब्लडमून' म्हणतात.
चंद्रग्रहणामध्ये पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी येते. पृथ्वीचं प्रतिमा चंद्रावर पडते. यादरम्यान चंद्र पूर्ण किंवा काही अंशी झाकला जातो. या स्थितीमध्ये सूर्याची किरणं चंद्रापर्यंत पोहचू शकत नाही.