PHOTOS

'तू खूप बारीक आहेस', 'या' सिंगरने नाकारला होता माधुरी दीक्षितच्या लग्नाचा प्रस्ताव!

Advertisement
1/11
'तू खूप बारीक आहेस', 'या' सिंगरने नाकारला होता माधुरी दीक्षितच्या लग्नाचा प्रस्ताव!
'तू खूप बारीक आहेस', 'या' सिंगरने नाकारला होता माधुरी दीक्षितच्या लग्नाचा प्रस्ताव!

Madhuri Dixit: बॉलिवूडची धक-धक गर्ल आजही तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. 80 च्या दशकात बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेल्या माधुरीच्या चाहत्यांची अजूनही कमतरता नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की एक काळ असा होता जेव्हा एका गायकाने माधुरीशी लग्न करण्यास नकार दिला होता.

2/11
अनेकांच्या मनात उत्सुकता
अनेकांच्या मनात उत्सुकता

यानंतर 1999 मध्ये माधुरीने डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न केले आणि आज या अभिनेत्रीला दोन सुंदर मुले आहेत. पण माधुरीच्या घरुन आलेला लग्नाचा प्रस्ताव नाकारणारा तो गायक कोण होता? याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असेल. त्याबद्दल जाणून घेऊया.

3/11
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री
 बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री

अभिनेत्री माधुरी दीक्षितने 1984 मध्ये राजश्री प्रोडक्शनच्या अबोध या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात तिला अनेक चित्रपटांना अपयश आले. पण 1988 च्या तेजाब चित्रपटाने तिला खरी ओळख मिळवून दिली. यानंतर दिल, बेटा, हम आपके हैं कौन, आणि दिल तो पागल है यासारख्या सुपरहिट चित्रपटांनी तिला बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनवले. 

4/11
पद्मश्री पुरस्कार
पद्मश्री पुरस्कार

अभिनय आणि नृत्यासाठी माधुरीला 17 फिल्मफेअर नामांकनांपैकी 6 पुरस्कार मिळाले. तसेच 2008 मध्ये भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

5/11
काही काळ अमेरिकेत स्थायिक
 काही काळ अमेरिकेत स्थायिक

1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाहानंतर माधुरी काही काळ अमेरिकेत स्थायिक झाली आणि चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. 2007 मध्ये आजा नचले चित्रपटातून तिने पुनरागमन केले. 

6/11
Madhuri Dixits marriage proposal singer suresh Wadkar had rejected Marathi News
Madhuri Dixits marriage proposal singer suresh Wadkar had rejected Marathi News

अलीकडेच त्या भूल भुलैया 3 (2024) मध्ये दिसली. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ती नच बलिए आणि झलक दिखला जा सारख्या रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणूनही दिसली.

7/11
आजही तितकेच उत्सूक
 आजही तितकेच उत्सूक

माधुरीने आपले सौंदर्य, अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली. सध्या ती चित्रपट आणि डिजिटल मंचांवर सक्रिय असून तिचे चाहते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आजही तितकेच उत्सूक असतात.

8/11
चित्रपट पार्श्वभूमी नव्हती
 चित्रपट पार्श्वभूमी नव्हती

खूप कमी लोकांना माहिती आहे की, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी माधुरीशी लग्न करण्यास नकार दिला होता. सुरेश यांनी लग्न करण्यास नकार देण्याचे कारण देखील खूप आश्चर्यकारक होते. खरं तर माधुरी एका ब्राह्मण महाराष्ट्रीय कुटुंबातून आहे आणि तिला चित्रपट पार्श्वभूमी नव्हती.

9/11
वडिलांनी मुलगा शोधायला सुरुवात
 वडिलांनी मुलगा शोधायला सुरुवात

जेव्हा माधुरी प्रौढ झाली तेव्हा तिच्या वडिलांनी मुलगा शोधायला सुरुवात केली. पण अनेक प्रयत्नांनंतरही जेव्हा मुलगा सापडला नाही तेव्हा गायक सुरेश वाडकर अभिनेत्रीच्या वडिलांच्या मनात आले. हा तो काळ होता जेव्हा गायक सुरेश वाडकर त्यांच्या कारकिर्दीत नुकतेच भरारी घेत होते.

10/11
लग्न करण्यास नकार
 लग्न करण्यास नकार

सुरेश वाडकर हे माधुरीपेक्षा 12 वर्षांनी मोठे आहेत. त्यांनी माधुरीशी लग्न करण्यास नकार दिला. कारण ती खूप बारीक होती. आणि अभिनेत्रीच्या वडिलांना याचा खूप धक्का बसला. माधुरीच्या कुटुंबाला तिने चित्रपटांमध्ये जावे असे वाटत नव्हते.

11/11
अबोध चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण
अबोध चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण

जर माधुरीने सुरेश वाडकर यांच्याशी लग्न केले असते तर कदाचित बॉलिवूडला इतकी अद्भुत अभिनेत्री मिळाली नसती. सुरेश वाडकर यांनी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर काही वर्षांनी माधुरीने 1984 मध्ये अबोध चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.





Read More