Magh Purnima 2024 Upay : हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व असून यादिवशी स्नान आणि दान केल्यामुळे पुण्य प्राप्त होते. यादिवशी धन समृद्धीसाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. हिंदू धर्मात सर्व पौर्णिमेला शास्त्रांमध्ये विशेष महत्त्व असून माघ महिन्याची पौर्णिमा अतिशय फलदायी मानली गेली जाते. असं म्हणतात यादिवशी सर्व देव देवता पृथ्वीवर येतात. माघी पौर्णिमेला स्नान करुन दान केल्यास बत्तीस पट पुण्य मिळते असं म्हणतात. त्यामुळे ही पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं म्हणून माघ पौर्णिमेच्या दिवशी गरजू व्यक्तीला लोकरीचे कपडे दान करा.
करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी माघ पौर्णिमेला भगवान विष्णूला नमस्कार करून माघ महिन्याचे महत्त्व वाचा.
कुटुंबात कायम आनंद राहावा म्हणून माघ पौर्णिमेला गव्हाचे पीठ, गूळ, तूप आणि कोणतेही हंगामी फळ ब्राह्मणाला दान करा.
सकारात्मक विचारांच्या लोकांचा आयुष्यात समावेश करण्यासाठी माघ पौर्णिमेला दूध, दही, मध, गंगाजल आणि तुळशी मिक्स करुन पंचामृत भगवान विष्णूला अर्पण करा.
सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळावी आणि सुख आणि सौभाग्य वाढीसाठी माघ पौर्णिमेला घरात सौभाग्य बीसा यंत्राची योग्य प्रकारे स्थापना करा.
कुटुंबात संपत्ती वाढीसाठी माघ पौर्णिमेला भगवान विष्णूची विधिवत पूजा करा. आणि संध्याकाळी चंद्रदेवाला अर्घ्य द्यावं.
संतान सुखासाठी माघ पौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची कथा पाठ करावी आणि शक्य असल्यास व्रत देखील करा. तसंच तिळापासून बनवलेले लाडू मंदिरात दान करा. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)