PHOTOS

45 दिवसात 45 कोटी भाविक? कुंभमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांची कशी होते मोजणी?

पहिल्या 3 दिवसात साधारण 6 कोटी भाविकांनी संगमात स्नान केल्याची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
1/9
45 दिवसात 45 कोटी भाविक? कुंभमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांची कशी होते मोजणी?
45 दिवसात 45 कोटी भाविक? कुंभमध्ये स्नान करणाऱ्या भाविकांची कशी होते मोजणी?

Mahakumbh 2025:प्रयागराजमध्ये यावर्षी 13 जानेवारीपासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. हे मेळा 26 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. 14 जानेवारीच्या दिवशी 3.5 कोटीहून अधिक भाविकांनी संगमात डुबकी घेतली. पहिल्या 3 दिवसात साधारण 6 कोटी भाविकांनी संगमात स्नान केल्याची माहिती देण्यात आली आहे.

2/9
45 कोटी भाविक येण्याची शक्यता
 45 कोटी भाविक येण्याची शक्यता

या 45 दिवसांमध्ये साधारण 45 कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही आकडेवारी जाहीर केली होती. पण डोळे पोहोचणार नाहीत इतरी अफाट गर्दी असताना, इथे आलेल्या भाविकांची संख्या कशी मोजली जाते? याबद्दल जाणून घेऊया. 

3/9
भाविकांची संख्या मोजण्याची प्रथा 19 व्या शतकापासून
 भाविकांची संख्या मोजण्याची प्रथा 19 व्या शतकापासून

कुंभ मेळ्यात आलेल्या भाविकांची संख्या मोजण्याची प्रथा 19 व्या शतकापासून सुरु झाली. 1882 साली इंग्रजांनी कुंभच्या प्रमुख रस्त्यांवर बॅरियर लावून मोजणी केली होती. त्यावेळी साधारण 10 लाख भाविक आल्याचा अंदाज लावण्यात आला होता. 1906 च्या कुंभमध्ये साधारण 25 लाख लोक सहभागी झाले होते. 1918 च्या महाकुंभमध्ये साधारण 30 लाख लोकांनी संगममध्ये डुबकी लगावली होती.

4/9
एआय आणि सीसीटीव्हीच्या मदतीने गणना
एआय आणि सीसीटीव्हीच्या मदतीने गणना

यावेळी कुंभमेळ्यातील भाविकांची संख्या मोजण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जाणार आहे. या मेळ्यात 200 जागांवर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत.

5/9
268 जागांवर एकूण 1107 जागी सीसीटीव्ही कॅमेरा
268 जागांवर एकूण 1107 जागी सीसीटीव्ही कॅमेरा

संपूर्ण प्रयागराज शहरात 268 जागांवर एकूण 1107 जागी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. 100 हून अधिक पार्किंगच्या जागांवर 700 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत. याद्वारे वाहनांची आणि भाविकांची गणना केली जाते.

6/9
होडी, वाहन आणि साधुंच्या कॅंपची मोजणी
होडी, वाहन आणि साधुंच्या कॅंपची मोजणी

भाविकांच्या संख्येचा अंदाज त्यांनी आणलेल्या होड्या, ट्रेन, बस आणि खासगी वाहनांची गणना करुन लावण्यात येतो. साधु संत आणि आखाड्यात आलेल्या भक्तांची संख्या यात जोडली जाते. यात एका व्यक्तीची गणना कित्येकदा होऊ शकते. कारण लोकं वेगवेगळ्या घाटावर स्नान करतात. वेगवेगळ्या भागात फिरतात.

7/9
याआधी कशी व्हायची गणना?
याआधी कशी व्हायची गणना?

2013 च्या आधी भाविकांची गणना डीएम आणि एसएसपीच्या अहवालारुन ठरवायची. यात बस, ट्रेन आणि खासगी वाहनांच्या आकड्याचा समावेश असायत. याआधी गणना थोडी सोपी असायची.पण वाढती लोकसंख्या आणि शहरांची रहदारीचे कठोर निर्बंध यामुळे मोजणी किचकट झाली आहे.

8/9
2013 नंतर नवी पद्धत
2013 नंतर नवी पद्धत

डीडब्ल्यूच्या एका रिपोर्टनुसार, 2013 च्या कुंभमध्ये पहिल्यांदाच कुंभमध्ये सांख्यिकी पद्धतीचा वापर करण्यात आला. स्नानासाठी महत्वाची जागा आणि वेळ आदार मानला गेला. आकड्यांनुसार, एका व्यक्तीला स्नानासाठी 0.25 मीटर जागा आणि 15 मिनिटांचा वेळ लागतो.

9/9
44 घाटांवर स्नान
44 घाटांवर स्नान

अशाप्रकारे एका तासात एका घाटावर साधारण 12 हजार 500 लोकं आंघोळ करु शकतात. यावर्षी प्रयागराजमध्ये 44 घाटांवर स्नान करता येणार आहे. या घाटांवर सलग 18 तास स्नान झाले तर प्रशासनाने दिलेल्या आकड्यानुसार ही संख्या खूप कमी बसू शकते. 





Read More