PHOTOS

₹24000 कोटींचा राजवाडा, ₹20000 कोटी बँक बॅलन्स... दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी ते खऱ्या आयुष्यातील महाराणी!

Advertisement
1/13
₹24000 कोटींचा राजवाडा, ₹20000 कोटी बँक बॅलन्स... दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी ते खऱ्या आयुष्यातील महाराणी!
₹24000 कोटींचा राजवाडा, ₹20000 कोटी बँक बॅलन्स... दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी ते खऱ्या आयुष्यातील महाराणी!

The Queen of Baroda: नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली 'द रॉयल्स' ही वेब सिरीज आजकाल भारतीय राजघराण्यांच्या संतापाचे कारण बनलीय. या मालिकेत भारतीय राजघराणे, राजे आणि राण्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा राजघराण्यांचा आरोप आहे. 

2/13
सौंदर्यासाठी ओळख
सौंदर्यासाठी ओळख

राजघराण्याची कंगाली, दारूत बुडलेला राजा, कमी कपड्यांमध्ये दाखवलेल्या राण्या अशा चित्रामुळे बडोद्याच्या महाराणी राधिकाराजे गायकवाड यांनाही राग अनावर झाला.साधेपणा, साडी आणि सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बडोद्याच्या राणीने द रॉयल सिरीजवर राजघराण्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केलाय. या निषेधानंतर या मालिकेची जितकी चर्चा होतेय तितकीच महाराणी राधिकाराजे गायकवाड यांचीही चर्चा होतेय.

3/13
बडोद्याची महाराणी कोण आहे?
बडोद्याची महाराणी कोण आहे?

राधिका यांच्या नावात 'महाराणी' असेल पण त्यांचा साधेपणा सामान्य माणसासारखा आहे. राहण्यासाठी जगातील सर्वात मोठा राजवाडा आहे पण त्यांच्या जीवनशैलीत कोणताही दिखाऊपणा नाही. तिजोरीत कोट्यवधींची संपत्ती पण ही महाराणी कधी 100 वर्षे जुनी पैठणी साडी तर कधी 150 वर्षे जुनी जामदानी साडी परिधान करताना दिसतात. त्या इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

4/13
राणी राधिकाराजे गायकवाड
राणी राधिकाराजे गायकवाड

 

दिसायला इतकी सुंदर असलेल्या महाराणींच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. महाराणी राधिकाराजे गायकवाड राजघराण्याच्या ग्लॅमरच्या मागे अतिशय साधे जीवन जगतात.

5/13
दिल्ली विद्यापीठात शिक्षण
दिल्ली विद्यापीठात शिक्षण

महाराणी राधिकाराजे गायकवाड यांना संपत्तीची कमतरता नाही पण त्या साधी जीवनशैली जगतात. दिल्लीत शिक्षण घेतलेल्या राधिकाराजे यांना कधीही त्यांच्या मैत्रिणींना आपण राजकुमारी असल्याचे कळू दिले नाही. त्यांचे वडील डॉ. रणजीत सिंहदेखील राजघराण्यातील आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या (डीयू) लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवी मिळवली. नंतर मध्ययुगीन भारतीय इतिहासात पदव्युत्तर पदवी घेतली.

6/13
डीटीसी बसने प्रवास
डीटीसी बसने प्रवास

राधिका दिल्लीत शिकत असताना राजकुमारी होत्या पण त्यांचा स्वभाव तसा नव्हता. त्या कॉलेजमध्ये ये-जा करण्यासाठी डीटीसी बसने प्रवास करायच्या. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनीने इंडियन एक्सप्रेसमध्ये पत्रकार म्हणून काम केले. सामान्य लोकांप्रमाणे त्यांनी 9 ते 5 शिफ्टमध्ये काम केले. त्यावेळी त्यांना पगारही तुटपुंजा होता.

7/13
अभ्यासासोबत काम करताना
अभ्यासासोबत काम करताना

राधिका यांना पैशाचा गर्व नव्हता. त्या शिक्षण घेताना नोकरीही करायच्या. सुमारे 3 वर्षे पत्रकार म्हणून काम केल्यानंतर 2000 मध्ये त्यांचे लग्न बडोद्याचे राजकुमार समरजीत गायकवाड यांच्याशी झाले आणि त्या बडोद्याची राणी बनल्या. त्यांच्याकडे राहण्यासाठी जगातील सर्वात मोठा राजवाडा लक्ष्मी विलास पॅलेस, कोट्यवधींची मालमत्ता आणि राणीचा मुकुट होता. पण कधी गर्व नव्हता.

8/13
लग्नानंतर अपूर्ण स्वप्न पूर्ण झाले
लग्नानंतर अपूर्ण स्वप्न पूर्ण झाले

राधिकाकडे सर्वस्व होते, पण तिचे एक स्वप्न अपूर्ण राहिले. राधिकाला परदेशी पदवी हवी होती. लग्नानंतर, महाराजांच्या पाठिंब्याने तिला तिचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. कला आणि संस्कृतीतील तिच्या कार्यासाठी पूर्व लंडन विद्यापीठाने तिला मानद डॉक्टरेट ऑफ आर्ट्स पदवी दिली आहे.

9/13
लक्ष्मी विलास पॅलेसचे मालक
लक्ष्मी विलास पॅलेसचे मालक

वडोदराचा 'लक्ष्मी विलास पॅलेस' किंवा बडोदा पॅलेस हा गायकवाड राजघराण्याचा राजवाडा आहे. वडोदराचा लक्ष्मी विलास पॅलेस हा जगातील सर्वात मोठा खासगी निवासस्थान आहे. 2013 पासून ते त्यांच्या कुटुंबासह या राजवाड्यात राहतात. 1875 मध्ये बडोदा रियासताचे महाराजा सयाजीराव यांनी बडोद्यात लक्ष्मी विलास पॅलेस बांधला.

10/13
लक्ष्मी विलास पॅलेस विशेष का आहे?
लक्ष्मी विलास पॅलेस विशेष का आहे?

हाउसिंग डॉट कॉमच्या मते, लक्ष्मी विलास हे जगातील सर्वात मोठ्या खासगी निवासस्थानांपैकी एक आहे. जे ब्रिटनच्या राजवाड्या बकिंगहॅम पॅलेसपेक्षा 4 पट मोठे आहे. 3,04,92,000 चौरस फूट जागेत पसरलेल्या या महालात 170 खोल्या आहेत. ते बांधण्यासाठी 12 वर्षे लागली. या महालात प्रचंड बाग, घोडेस्वारी महाल, स्विमिंग पूल, गोल्फ कोर्स अशा सर्व सुविधा आहेत.

11/13
किंमत किती?
किंमत किती?

 

समरजितसिंग गायकवाड हे सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये गणले जातात. त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याचे प्रतिनिधित्व केले होते. लक्ष्मी विलास पॅलेसची किंमत सुमारे 24000 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. त्याच वेळी, महाराणी राधिकाराजे आणि समरजितसिंग गायकवाड यांची वैयक्तिक मालमत्ता सुमारे 20000 कोटी रुपये आहे.

12/13
अशी असते महाराणी
अशी असते महाराणी

 

महाराणी राधिकाराजे या खऱ्या आयुष्यातली राणी आहेत. त्या दिवसातील बहुतेक वेळ सामाजिक कार्यात घालवत राजघराण्याचा वारसा पुढच्या पिढीकडे घेऊन जातायत. त्या सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. 

13/13
तुम्हीही राजवाड्याला भेट देऊ शकता
तुम्हीही राजवाड्याला भेट देऊ शकता

जर तुम्हाला राजे-महाराजांचे जीवन आणि त्यांची जीवनशैली पहायची असेल तर तुम्ही लक्ष्मी विलास पॅलेसला भेट देऊ शकता. तुम्ही तिकीट खरेदी करून राजवाड्याच्या संग्रहालयाच्या भागात जाऊ शकता.





Read More