PHOTOS

Fadnavis Birthday: हौशी मॉडेल ते मुख्यमंत्री...बर्थ-डे बॉय फडणवीसांबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयत का?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जुलै रोजी 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत. भाजपचा विश्वासू चेहरा असलेल्या फडणवीसांची महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पकड आहे

Advertisement
1/8
Fadnavis Birthday: हौशी मॉडेल ते मुख्यमंत्री...बर्थ-डे बॉय फडणवीसांबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयत का?
Fadnavis Birthday: हौशी मॉडेल ते मुख्यमंत्री...बर्थ-डे बॉय फडणवीसांबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयत का?

Devendra Fadnavis: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 22 जुलै रोजी 54 वा वाढदिवस साजरा करत आहेत. भाजपचा विश्वासू चेहरा असलेल्या फडणवीसांची महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पकड आहे. मजबूत नेतृत्व, प्रशासनावरील पकड असलेले देवेंद्र फडणवीस 2014 ते 2019 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

2/8
38 व्या वर्षी मुख्यमंत्री
 38 व्या वर्षी मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस हे वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्री बनले. शरद पवार हे 1978 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते. यानंतर तरुण मुख्यमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीसांचा नंबर लागतो. 

3/8
22 व्या वर्षी महापौर
 22 व्या वर्षी महापौर

देवेंद्र फडणवीसांचा जन्म 22 जुलै 1970 रोजी नागपूरमध्ये झाला. त्यांच्या घरातील सदस्य सक्रिय राजकारणात होते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून केली होती.वयाच्या 22 व्या वर्षी ते नागपूर महापालिकेचे महापौर झाले. फडणवीसांनाा आपण विधानसभेत अत्यंत मुद्देसूद बोलताना ऐकले असेल. यामागे त्यांच्या राजकीय अनुभवासोबत शिक्षणाचाही तितकाच मोठा वाटा आहे.

4/8
शिक्षणाविषयी
शिक्षणाविषयी

नागपूरच्या शंकर नगर चौक येथील सरस्वती विद्यालयातून देवेंद्र फडणवीस यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.देवेंद्र फडणवीस यांनी पुढे जाऊन नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथे त्यांनी 5 वर्षांच्या लॉ पदवीसाठी प्रवेश घेतला. 1992 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी मिळविली.लॉची पदवी घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर जर्मनीतील डीएसई बर्लिन या संस्थेत त्यांनी डिप्लोमा इन मेथड्स अंण्ड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळविला.

5/8
मॉडेलिंग
 मॉडेलिंग

देवेंद्र फडणवीस यांनी काही काळ मॉडेलिंगदेखील केली होती.नागपूरच्या एका दुकानासाठी त्यांनी मॉडेल म्हणून काम केलं होतं. त्यांचे मॉडेलिंगचे फोटो सोशल मीडियात चर्चेत असतात.

6/8
18 वे मुख्यमंत्री
18 वे मुख्यमंत्री

ऑक्टोबर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री बनले. यावेळी त्यांनी शेती,ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा, शहरी विकास आणि सामाजिक कल्याण विभागांमध्ये भरीव कामगिरी केली.

7/8
विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका
विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका

मुख्यमंत्री पदाचा कार्यभाग संभाळल्यानंतर 2019 नंतर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली.महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने 2014 ची विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 288 पैकी 133 जागांवर विजय मिळवला.

8/8
पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार
 पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

जागा वाटपाच्या मतभेदांवरून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती तुटल्यामुळे त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. असे असतानाही आजपर्यंतच्या विधानसभेतील भाजपची ही सर्वोच्च संख्या होती. यामुळे देवेंद्र फडणवीस हे पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. पुढच्या काळात शिवसेना पक्ष मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाला. जी युती 2019 पर्यंत सुरु राहिली.





Read More