PHOTOS

Maharashtra Din 2025 : महाराष्ट्राबाहेर 'महाराष्ट्र' गाजवणारी संस्थानं अन् मराठमोळी घराणी

Maharashtra Din 2025 : महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं अभिमान वाटावा अशी आणखी एक कमाल माहिती.... पाहा कुठवर होता या राज्याचा दबदबा.... 

Advertisement
1/7
शालिवाहनांपासूनचा इतिहास
शालिवाहनांपासूनचा इतिहास

Maharashtra Din 2025 : शालिवाहनांपासूनच्या इतिहासात डोकावून पाहिलं असता हे राज्य नेमकं कसं आकारास आलं याचा अंदाज येतो आणि पुढं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनं मराठी भाषिकांसाठीच्या या राज्यात झालेली क्रांतीसुद्धा डोळ्यांसमोर उभी राहते. अशा या राज्यात छत्रपतींच्या राजघराम्यापुढं आजही प्रत्येकजण मानाचा मुजरा केल्यावाचून राहत नाही. 

 

2/7
अस्तित्वं
अस्तित्वं

महाराष्ट्राप्रमाणंच राज्याबाहेरही काही अशी राजघराणी आहेत ज्यांनी विविधभाषिक राज्यांमध्ये आपलं अस्तित्वं जपत तिथंही महाराष्ट्र आणि मराठी बाणा खऱ्या अर्थानं गाजवला. साधारण 17 आणि18 वं शतकात मराठा साम्राज्याच्या विस्तारासह संरक्षणासाठी प्रयत्नशील दिसलं. 

3/7
राजघराणी
राजघराणी

उपलब्ध माहितीनुार मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, होयसाळ, चौहान, गुहिल, सिसोदिया, सोळंकी, परमार, अभिर अशा उत्तर आणि दक्षिण भारतातील प्राचीन क्षत्रिय घराण्यांशी मराठ्यांची पाळंमुळं आहेत. राज्याबाहेरच्या अशाच काही राजघराण्यांची नावं पाहाच.... 

4/7
ग्वाल्हेरचे सिंधिया (शिंदे)
ग्वाल्हेरचे सिंधिया (शिंदे)

महादजी शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि त्यालगत असणाऱ्या प्रांताची संपूर्ण जबाबदारी सिंधीया (शिंदे) राजघराण्याच्या खांद्यांवर होती. 

 

5/7
बडोद्याचे गायकवाड
बडोद्याचे गायकवाड

तेव्हाचं बडोदा आणि आताचं वडोदरा.... मराठ्यांच्या सुवर्ण दिवसांपासूनच सध्याच्या गुजरातमध्ये असणाऱ्या वडोदरा अर्थात बडोद्यामध्ये गायकवाड राजघराण्याची सत्ता होती. आजही या घराण्याला तिथं प्रचंड मानसन्मान दिला जातो. 

 

6/7
इंदूरचे होळकर
इंदूरचे होळकर

मध्य प्रदेशातील इंदूर इथं होळकर राजघराण्यानं आपलं अस्तित्वं कायम राखत या राजघराण्यातील राजांसह महाराण्यांनीसुद्धा समाजात मोलाचं योगदान दिलं. 

 

7/7
तंजावूरचे भोसले
तंजावूरचे भोसले

भोसले राजघराण्याचा महाराष्ट्रात बुलंद आवाज असतानाच तिथं दक्षिणेकडे असणाऱ्या तंजावर/ तंजावूर इथं भोसले घराण्याचं अधिपत्य होतं. तंजावूरचं भोसले राजघराणं अशी त्यांची ओळख. (माहिती सौजन्य- विकीपिडीया/ छाया सौजन्य- सरमान्य आणि सोशल मीडिया)

 





Read More