PHOTOS

भारतातील सर्वात श्रीमंत राज्य महाराष्ट्र; तर दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य?

Richest Indian States : भारत हा विविधतेने नटलेला आणि अनेक संस्कृतीचा संगम असणारा देश आहे. इथे असलेल्या प्रत्येक राज्यांनी आपली अशी खास ओळख निर्माण केली आहे. त्यासोबत भारताच्या अर्थव्यवस्थेत प्रत्येक राज्य आपलं योगदान देते असतो. पण तुम्हाला माहितीय भारतातील सर्वात श्रीमंत राज्य हे महाराष्ट्र असलं तरी दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे ते? तुम्हाला जर वाटत असेल ते गुजरात असेल तर तुम्ही चुकीचे आहात. 

Advertisement
1/11

देशाची अर्थव्यवस्था वाढत असताना, काही राज्ये संपत्ती आणि समृद्धीमध्ये आघाडीवर येत आहेत. काही राज्ये त्यांच्या मजबूत धोरणांमुळे आणि जलद विकासामुळे शक्तिशाली म्हणून उदयास आली आहेत. 

2/11
मध्य प्रदेश
मध्य प्रदेश

भारताचे हृदय म्हणून ओळखले जाणारे मध्य प्रदेश श्रीमंत राज्याच्या यादीत 10 स्थानावर आहे. या राज्याची लोकसंख्या सुमारे 7.5 कोटी असून जीएसडीपी 13.87 लाख कोटींच्या घरात आहे. 

3/11
तेलंगणा
तेलंगणा

त्यानंतर नंबर लागतो तो तेलंगणा राज्याचा. या राज्यची लोकसंश्या 4 कोटी एवढी असून हे राज्य हळूहळू मार्गावर पुढे जात आहे. तर या राज्याचा जीएसडीपी 14 लाख कोटी रुपये असून जो त्याच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब आहे.

4/11
आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेश

या यादीत आठव्या स्थानावर आंध्र प्रदेश येत असून यांचा जीएसडीपी 14.49 लाख कोटी रुपये आहे. विशाखापट्टणम येथे असलेले त्याचे बंदर आणि औद्योगिक क्षेत्र वेगाने वाढत आहे. त्याची लोकसंख्या सुमारे 8.5 कोटी आहे.

5/11
राजस्थान
राजस्थान

समृद्ध इतिहास आणि संस्कृतीसाठी ओळखले जाणारे राजस्थान आता आर्थिकदृष्ट्याही मजबूत होताना दिसत आहे. या राज्याचा जीएसडीपी 15.7 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. येथे शेती, पर्यटन आणि इतर क्षेत्रे देखील विकसित झाली असून त्याची लोकसंख्या सुमारे 7 कोटी आहे.

6/11
पश्चिम बंगाल
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल हे भारतातील सहावे सर्वात श्रीमंत राज्य असून याचा जीएसडीपी 17.19 लाख कोटी आहे. त्याची चैतन्यशील संस्कृती आणि व्यावसायिक क्षेत्र हे विशेष बनवते. त्याची लोकसंख्या 9 कोटींहून अधिक आहे.

7/11
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेश

भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशचा जीएसडीपी 24.39 लाख कोटी आहे. गेल्या काही वर्षांत येथे कृषी, उत्पादन आणि सेवा क्षेत्रे वेगाने वाढली आहेत.

8/11
कर्नाटक
कर्नाटक

दक्षिण भारतात स्थित कर्नाटक हे देशातील चौथे सर्वात श्रीमंत राज्य म्हणून उदयास आलं आहे. या राज्याचा जीएसडीपी सुमारे 25 लाख कोटींचा घरात आहे. कर्नाटक आयटी, बायोटेक आणि एरोस्पेस सारख्या क्षेत्रात आघाडीवर आहे. या राज्याची लोकसंख्या 6 कोटींहून अधिक आहे.

9/11
गुजरात
गुजरात

गुजरात हे भारतातील तिसरं सर्वात श्रीमंत राज्य असून जीडीपी 25.62 लाख कोटी रुपये आहे. हे राज्य केवळ त्याच्या संस्कृतीसाठीच नाही तर त्याच्या मजबूत रेल्वे, बंदर आणि रस्ते नेटवर्कसाठी देखील ओळखले जाते. त्याची लोकसंख्या 6 कोटींहून अधिक आहे.

10/11
तामिळनाडू
तामिळनाडू

तामिळनाडू हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत राज्य आहे. राज्याचा जीडीपी 28.3 लाख कोटी रुपये आहे. ते अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल आणि वस्त्रोद्योग क्षेत्रात उत्कृष्ट आहे. त्याची लोकसंख्या 7 कोटींहून अधिक आहे. 

11/11

महाराष्ट्र हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे, ज्याचा जीडीपी 38.79 लाख कोटी रुपये आहे. म्हणून महाराष्ट्राला भारताची आर्थिक राजधानी अशी ओळख मिळाली आहे. येथे औद्योगिकीकरण शिगेला पोहोचले आहे आणि कापूस, सोयाबीन आणि ऊसाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात होते. या राज्याची लोकसंख्या 11 कोटींहून अधिक आहे.





Read More