PHOTOS

मोठी घोषणा! 'मुख्यमंत्री योजनादूत' कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार 'इतके' रुपये

राज्यातील तरुणांसाठी आता 'मुख्यमंत्री योजनादूत' कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.  या कामांसाठी पुढील 6 महिन्यात 50 हजार युवकांची नेमणूक केली जाणार आहे.

Advertisement
1/8
मोठी घोषणा! 'मुख्यमंत्री योजनादूत' अंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार 'इतके' रुपये
मोठी घोषणा! 'मुख्यमंत्री योजनादूत' अंतर्गत  50 हजार युवकांना मिळणार 'इतके' रुपये

Sarkari Yojana: लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.राज्यातील तरुणांसाठी आता 'मुख्यमंत्री योजनादूत' कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. 

2/8
राज्यभरात या कार्यक्रमाची अंमलबजावणी
 राज्यभरात या कार्यक्रमाची अंमलबजावणी

महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य रोजगार आणि उद्योजकता या विभागामार्फत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून राज्यभरात या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 

3/8
काय काम?
काय काम?

या योजनेअंतर्गत तरुणांना महाराष्ट्रात राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करावा लागणार आहे. या कामांसाठी पुढील 6 महिन्यात 50 हजार युवकांची नेमणूक केली जाणार आहे. या तरुणांना दरमहा 10 हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे.

4/8
50 हजार युवक
 50 हजार युवक

या सर्व 50 हजार युवकांना मुख्यमंत्री योजनादूत असे संबोधले जाईल. यांना दिलेले कामकाज शासकीय सेवा म्हणून गृहीत धरले जाणार नाही. यासाठी तब्बल 300 कोटी खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

5/8
ग्रामपंचायतसाठी 1 दूत
 ग्रामपंचायतसाठी 1 दूत

ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत साठी 1 मुख्यमंत्री योजनादूत म्हणून व्यक्तीची  नेमणूक केली जाणार तर शहरी भागात प्रत्येक 5 हजार लोकसंख्येमागे 1 व्यक्तीची नेमणूक केली जाणार.

6/8
पदवीधरांना संधी
 पदवीधरांना संधी

यासाठी अर्जदार तरुण कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 वय वर्ष असणे आवश्यक आहे. 

7/8
अर्जाची छाननी
अर्जाची छाननी

ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक अर्जाची छाननी केली जाईल. पुढे जिल्हा माहिती अधिकारी यासंदर्भात उमेदवाराची नेमणूक करतील.

8/8
नेमकी तारीख अद्याप निश्चित नाही
 नेमकी तारीख अद्याप निश्चित नाही

मुख्यमंत्री योजनादूतच्या भरती प्रक्रिया संदर्भातील नेमकी तारीख अद्याप निश्चित झाली नाही. दरम्यान प्रत्येक जिल्हा स्तरावर समन्वय राखण्यासाठी 1 नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.





Read More