Maharashtra Amaravati Tourist Places: महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गड किल्ल्यांसह अनेक ऐतिहासिक वास्तू महाराष्ट्रात आहेत. यापैकीच एक आहे ती अमरावतीमधील पायविहीर. 800 वर्ष प्राचीन पायविहीर स्थापत्यशैलीचे अनोखे उदाहरण आहे.
अमरावती जिल्ह्यात वसलेल्या महिमापूर स्टेपवेल अर्थात पायविहीर सुंदर वास्तुकलेचा नमुना आहे.
ही विहीर मुघलकालीन आहे. या विहिरीला 12 दरवाजे आहेत. विहिरीचे कोरीव काम एवढे अद्भुत आहे की, ते पाहून सारे थक्क होतात.
स्थापत्यशैलीचा अजोड व अनोखा नमुना असलेली महिमापूरची ऐतिहासिक विहीर ही सातमजली आहे.
700 ते 800 वर्ष जुनी ही पायविहीर अत्यंत रहस्यमयी मानली जाते. विहिरीच्या आत आजदेखील कपारीसमान गूढ रचना आहे, त्या कपारी नेमक्या कशासाठी होत्या याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.
साधारण 14 व्या शतकात ही विहीर बांधण्यात आली. मात्र, ही नेमकी कधी आणि कुणी बांधली याची काहीच माहिती उपलब्ध नाही.
ऐतिहासिक पायविहीर दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या छोट्याशा गावात आहे.
या विहीरीची रचना मंत्रमुग्ध करणारी आहे. अतिशय सूक्ष्म कारागिरी प्राचीन काळात घेऊन जाईल.