Maharashtra Tourism News: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: जातीने यामध्ये लक्षत घालत आहेत. नेमकं हे सेलिब्रेशन कसं असणार जाणून घेऊयात...
राज्य सरकार चक्क एका धरणाचा वाढदिवस साजरा करणार आहे असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या सेलिब्रेशनचं आयोजन केलं जाणार आहे. हे धरण कोणतं? त्याचा इतिहास काय? सेलिब्रेशन कसं होणार? पाहूयात... (फोटो सोशल मीडियावरुन साभार)
राज्य सरकार चक्क एका धरणाची जन्मशताब्दी म्हणजेच शंभरावा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. (फोटो सोशल मीडियावरुन साभार)
अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागाची लाईफलाइन समजले जाणारे भंडारदरा धरणाच्या उभारणीला पुढील वर्षी 2026 मध्ये 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. (फोटो सोशल मीडियावरुन साभार)
क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं भंडारदरा धरणाचं अधिकृत नाव आहे. ब्रिटिश काळात 1910 मध्ये हे धरण बांधण्याचे काम सुरू झाले आणि 1926 मध्ये ते बांधून पूर्ण झाले. (फोटो सोशल मीडियावरुन साभार)
अकोले तालुक्यातील या धरणामुळे अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा या तालुक्यांमधील सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. कृषी, सहकार आणि उद्योग क्षेत्रातील प्रगतीसाठी हे धरण लाइफलाइन ठरले आहे. (फोटो सोशल मीडियावरुन साभार)
भंडारदरा धरणाला लाभलेल्या ऐतिहासिक, नैसर्गिक आणि भौगोलिक पार्श्वभूमीचा विचार करता त्याचे शतक महोत्सवी वर्ष कशा पद्धतीने कसे साजरे करावे यासाठी सूचना करण्याचे काम भंडारदरा धरण शताब्दी महोत्सव समिती करणार आहे. (फोटो सोशल मीडियावरुन साभार)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समितीचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, राज्याचे मुख्य सचिव, जलसंपदा व वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि जलसंपदा विभागाचे सचिव हे समितीचे सदस्य असतील. (फोटो सोशल मीडियावरुन साभार)
या जलाशयाच्या संवर्धनासाठी काय करावे, या ठिकाणी निसर्ग पर्यटनाच्या वृद्धीसाठीच्या उपाययोजना, शताब्दी महोत्सवाच्या अनुषंगाने हाती घ्यावयाचे उपक्रम याबाबत ही समिती सरकारला शिफारशी करेल. (फोटो सोशल मीडियावरुन साभार)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ही समिती सहा महिन्यांच्या आत अहवाल देईल. त्यानंतर या शताब्दी मोहत्सवाची नेमकी रुपरेषा निश्चित केली जाईल, असं सांगण्यात आलं आहे. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)