Maharashtra Weather Update : मागील महिन्याभरापासून राज्यात सुरु असणारं अवकाळीचं सत्र येते पाच दिवसही कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
येत्या पाच दिवसांमध्ये राज्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल. शिवाय गारपीटीचाही तडाखा बसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. (छाया सौजन्य- स्कायमेट)
मराठवाड्याचा बराचसा भाग आणि मध्य महाराष्ट्रातच गारपीटीमुळं येत्या काही दिवसांत नुकसान होऊ शकतं. (छाया सौजन्य- स्कायमेट)
तुलनेनं कोकण आणि विदर्भाला गारपीटीचा फारसा फटका बसणार नाही. असं असलं तरीही या भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरुच असेल. (छाया सौजन्य- स्कायमेट)
ढगाळ वातावरण आणि मधूनच येणारा सूर्यप्रकाश यामुळं फळं आणि भाजीपाल्यावर मात्र गंभीर परिणाम होताना दिसणार आहेत. तर, तिथे नागपूर, अमरावती, नाशिक, कोल्हापूरमध्येही पावसाची हजेरी असेल.
मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातल विदर्भ, मराठवाड्यासह कोकण भागाला पावसानं चांगलं झोडपून काढलं. यामध्ये अवकाळी पावसाच्या तडाख्यात काही दुर्घटनाही घडल्याचं पाहायला मिळालं होतं. तर, काही भागांत गारपीटीनं मोठी नासधूस झाल्याचंही चित्र समोर आलं होतं.
मुंबईसह कोकण पट्ट्यामध्ये मंगळवार- बुधवारी ढगाळ वातावण असेल, तर 12 एप्रिलनंतर पुढील दोन दिवस या भागांत पावसाची हजेरी नसेल.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, पुणे, मराठवाडा या भागांमध्ये मात्र 15 एप्रिलपर्यंत पाऊस मुक्कामी असेल. तर, 16 एप्रिलनंतर तो कमी वेगानं काढता पाय घेण्यास सुरुवात करणार आहे.