राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. अनेक जिल्ह्यात तर तापमान 4 अंशापर्यंत गेले आहेत. नंदूरबारमध्ये गवतावर व वाहनांवर बर्फाची चादर पसरली आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळं राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. महाराष्ट्रात किमान तापमान आठ अंश सेल्सिअसवर आल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात शीत लहरीचा प्रकोप वाढत आहे. सातपुडा पर्वत रांगामधील वालंबा, डाब आणि तोरणमाळ परिसरात तापमानात मोठी घट झाल्याने थेट दवबिंदु गोठल्याचा प्रकार समोर आला आहे.
दवबिंदु गोठल्याने गवतांवर बर्फाची चादर पसरल्याचे चित्र दिसुन आले. या सोबतच चारचाकी वाहनांच्या टपावर बर्फ जमा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही वर्षापासुन या भागात तापमानात मोठ्य प्रमाणात घट होत असल्याने अशा पद्धतीने दवबिंदु गोठुन बर्फाची चादर होत असल्याचे चित्र दिसुन आले आहे.
अशातच कडाक्याच्या थंडीने सातपुडा पर्वत रांगामध्ये सकाळी उशीरापर्यत शेकोट्या पेटत असल्याचे चित्र आहे.
गेल्या 48 तासात नंदुरबारमधील सातपुडा परिसरात भागात तापमानात 08 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाल्याचे पहावयास मिळाले होते. अशातच सातपुड्याच्या पर्वत रागांमध्ये समुद्र सपाटीभागापेक्षा तापमान चार ते पाच अंशापर्यंत खाली आलेलं आहे.
राज्यातील धुळे येथील कृषी महाविद्यालयात मंगळवारी देशातील सर्वात कमी ४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान मोसमातील सर्वात निचांकी ठरले आहे.