बोल्ड आणि बिनधास्त अशी ओळख असणाऱ्या सई ताम्हणकरचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील लुक चर्चेत. नेटकऱ्यांना करतोय आकर्षित.
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर ही बोल्ड आणि बिनधास्त तसेच ग्लॅमरस लुक आणि तिच्या हटके अभिनयामुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.
अलिकडेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर नवनवीन लुकमधील फोटो शेअर केले. ज्यामध्ये तिने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी केलेला लुक व्हायरल झाला आहे.
सईने या सोहळ्यासाठी केलेल्या खास लुकमधील काही खास फोटो चाहत्यांसाठी पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक हटके पोज देऊन चाहत्यांना आकर्षित केलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सई ताम्हणकरने हे फोटोशूट तिच्या घराच्या बाल्कनीमध्ये केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
सई नेहमी बोल्ड आणि हटके अदांमुळे चर्चेत असते. यावेळी देखील ती तिच्या हटके वेणी स्टाईलमुळे चर्चेत आलीय. ती या लुकमध्ये खूपच हॉट दिसत आहे.
अभिनेत्रीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम केलं आहे. त्यासोबतच अनेक वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये तिने कामं केलं आहे.
तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.