PHOTOS

महाराष्ट्राची लेक, श्रद्धा कपूरचे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे 7 ब्लॉकबस्टर चित्रपट

Shraddha Kapoor's Blockbuster Movies: श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील सुंदर आणि गोंडस अभिनेत्री, जिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखोंची मनं जिंकली आहे. तिने तिच्या 14 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आणि स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. 

Advertisement
1/8

श्रद्धा कपूर 38वा वाढदिवस साजरा करत असतानाच तिच्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी तिला सोशल मीडीयावर गोड शुभेच्छा दिल्या आहेत. श्रद्धाने 2010 मध्ये 'तीन पत्ती' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि आज ती इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. महाराष्ट्राची लेक अशी ओळख असणाऱ्या या श्रद्धाचे आणखी गाजलेले चित्रपट माहितीयेत? 

2/8
'आशिकी 2'
'आशिकी 2'

2013 मधील मोहित सुरी दिग्दर्शित 'आशिकी 2' हा एक संगीतमय रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटाने श्रद्धाला इंडस्ट्रीत ओळख दिली आणि त्यामुळेच तिच्या करिअरला गती मिळाली. चित्रपटाचे बजेट फक्त 9 कोटी होते पण, त्याने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. चित्रपटातील 'तुम ही हो' हे गाणे तर आजही लोकप्रिय आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचे IMDb रेटिंग 7.1/10 आहे.

3/8
'छिछोरे'
'छिछोरे'

2019 मधील नितेश तिवारी दिग्दर्शित 'छिछोरे' हा एक विनोदी चित्रपट आहे. कॉलेज जीवनातील मैत्री आणि कॉलेजनंतरचा संघर्ष दर्शविणारा हा चित्रपट 70 कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला होता आणि त्याने 209.42 कोटी रुपयांची कमाई केली. 'छिछोरे' चित्रपटाने प्रेक्षकांना जीवनातील खरे आणि गोड पैलू दाखवले. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा आणि ताहिर राज भसीन सारखे कलाकार होते. या चित्रपटाचे IMDb रेटिंग 8.3/10 आहे. 

4/8
'ओके जानू'
'ओके जानू'

2017 मधील शाद अली दिग्दर्शित 'ओके जानू' हा एक रोमँटिक चित्रपट आहे. श्रद्धा आणि आदित्य रॉय कपूर यांच्यातील केमिस्ट्रीने चित्रपटाला लोकप्रियता दिली. हा चित्रपट 28 कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला आणि त्याने 41 कोटींची कमाई केली. या चित्रपटातील आधुनिक प्रेमकथा प्रेक्षकांना खूपचं आवडली. या चित्रपटाचे IMDb रेटिंग 5.3/10 आहे.

 

5/8
'स्त्री'
'स्त्री'

2018 मध्ये प्रदर्शित झालेला 'स्त्री' हा हॉरर-कॉमेडी चित्रपट 25 कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला आणि त्याने 180 कोटींची कमाई केली. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट एका अनोख्या कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये एका महिलेचा आत्मा गावातील पुरुषांना पळवून नेतो. या चित्रपटाचे IMDb रेटिंग 7.6/10 आहे.

6/8
'स्त्री 2'
'स्त्री 2'

गेल्या वर्षी 2024 मध्ये प्रदर्शित झालेला 'स्त्री 2' हा 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्त्री'चा सिक्वेल आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराणा पुन्हा एकदा एकत्र दिसले. यावेळी कथा अधिक रोमांचक आणि भयानक होती, ज्यामध्ये गावकरी एका भितीदायक पुरुषाच्या आत्म्याने त्रस्त होते. या चित्रपटाचे बजेट 50 कोटींचे होते मात्र, या चित्रपटाने 608.37 कोटींची कमाई केली. या चित्रपटाचे IMDb रेटिंग 7.2/10 आहे. 

7/8
'तू झूठी मैं मक्कार'
'तू झूठी मैं मक्कार'

2023 मध्ये प्रदर्शित झालेला 'तू झूठी मैं मक्कार' हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या केमिस्ट्रीने चित्रपटाला खूप लोकप्रियता दिली. 85 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या चित्रपटाने 230 कोटींची कमाई केली. हा चित्रपट हलक्या फुलक्या प्रेमकथेचा अनुभव देतो, ज्यामध्ये कॉमेडीचाही मसाला आहे. या चित्रपटाचे IMDb रेटिंग 6.5/10 आहे. 

8/8
'साहो'
 'साहो'

2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'साहो' या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला होता. 350 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने 504.23 कोटींची जबरदस्त कमाई केली. अ‍ॅक्शन आणि व्हीएफएक्सने परिपूर्ण असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक थरारक अनुभव ठरला. या चित्रपटाचे IMDb रेटिंग 5.2/10 आहे.





Read More