Mukhyamantri Annapurna Yojana : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा केली.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जातील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
मात्र, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सर्वांसाठी लागू असणार नाही. या योजनेसाठी काही निकष देखील आखून दिले गेले आहेत.
राज्य सरकारने राज्यातील 56 लाख 16 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. लाभार्थी महिलांना वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याबाबतची योजना जाहीर केली गेली.
बीपीएल रेशनकार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत.
योजनेच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 56 लाख 16 हजार महिलांना याचा थेट फायदा होणार असल्याने आनंद व्यक्त केला जातोय.
दरम्यान, राज्य सरकारच्या वतिने महिलांना देखील अनेक सुविधा यंदाच्या बजेटमधून देण्यात आल्या आहेत.