कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरामारातील महत्वाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दूर दृष्टी आणि शौर्याचा साक्षीदार आहे. हा एक अत्यंत जलदुर्ग देखील आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त किल्ले उभारले. यापैकी एका किल्ल्यावर महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत.
सिंधुदुर्ग किल्ला हा मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचा नौदल तळ होता.
महाद्वारापासून उजव्या बाजूच्या तटावर दोन देवळ्या आहेत. यांपैकी एका देवळीत डाव्या पायाचा व दुसरीमध्ये उजव्या हाताचा ठसा आहे.
या किल्ल्यावर शिवराजेश्वर नावाचे मंदिर देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची पदचिन्हे असलेले हे मंदिर आहे.
19 हेक्टर परिसरात सिंधुदुर्ग किल्ला पसरलेला आहे. किल्ल्याला 42 बुरुज आहेत.
मुंबईपासून 450 किमी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ला आहे. कुडाळ,कणकवली आणि सावंतवाडी ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.
कोकणात असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत.