Mahatma Jyotiba Phule Motivational Quotes in Marathi: आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 198 वी जयंती आहे. पुण्यातील फुले वाड्यात आज मोठ्या उत्साहात महात्मा फुले जयंती साजरी केली जाते. आजच्या दिवशी महात्मा फुलेंचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया.
थोर समाजसेवक, क्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. 11 एप्रिल 1827 रोजी त्यांचा जन्म झाला. ज्योतिबा फुलेंनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले. आजच्या दिवशी जाणून घेऊयात ज्योतिबांचे थोर विचार
शिक्षण ही स्त्री आणि पुरुषाची प्राथमिक गरज आहे.- महात्मा ज्योतिबा फुले
आपल्या आयुष्यात रोज नवनवीन कल्पना येतात, पण खरी धडपड ती प्रत्यक्षात आणण्यातच असते.-महात्मा ज्योतिबा फुले
नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे - महात्मा ज्योतिबा फुले
विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतिवान गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले-महात्मा ज्योतिबा फुले
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते-महात्मा ज्योतिबा फुले
जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका- महात्मा ज्योतिबा फुले