इंडियाच्या कॅप्टन कुलने त्याच्या खेळातूनच नाही तर त्याच्या वागण्या बोलण्यातून देखील अनेकांची मनं जिंकली.
टी 20 विश्वचषकात विजेतेपद मिळवल्यानंतर टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
कर्णधार रोहितने शेवटपर्यंत यशस्वीरित्या धुरा सांभाळली, त्यामुळे क्रिकेटप्रेमी आणि रोहितचे चाहते त्याचं भरभरुन कौतुक करत आहेत.
भारताला विश्वचषक मिळवून देणाऱ्या रोहितने टीम इंडियामध्ये 7व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सुरुवात केली होती.
2011 मध्ये महेंद्रसिंह धोनी कर्णधार असताना त्याने रोहितला टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी संधी दिली.
सलामीवीर म्हणून रोहितने सुरुवात केली मात्र त्याच्या कामगिरीवर सगळेच नाराज होते. त्याने द. अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फक्त 5 धावा केल्या होत्या.
त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याला पुन्हा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सांगितलं. त्याच्या खेळीवर बरेच प्रश्न निर्माण झाले होते.
दोन वर्षानंतर धोनीने रोहितला पुन्हा सलामीवीर म्हणून दुसरी संधी दिली.
रोहितला मिळालेल्या दुसऱ्या संधीचं त्याने सोनं केलं. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने 83 धावा केल्या.
त्यानंतर रोहितने कधीच मागे वळून पाहिलं नाही. दमदार खेळीमुळे रोहितचे आज जगभरात असंख्य चाहते आहेत.