South Cinema Superstar: वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयाला सुरुवात करून बनला 'टॉलीवूडचा राजकुमार'. आज करतोय साऊथ इंडस्ट्रीवर राज्य. ओळखलं का?
South Cinema Superstar: साउथमधील या सुपरस्टारला टॉलीवूडचा राजकुमार असं म्हटलं जातं. तो चित्रपटसृष्टीतील तेजस्वी ताऱ्यांपैकी एक आहे.
या अभिनेत्याचा उत्तम अभिनय, आकर्षक व्यक्तिमत्व आणि पडद्यावरची उपस्थिती या सर्व गोष्टीमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करून सर्वांचा आवडता बनला आहे.
आम्ही साउथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबूबद्दल बोलत आहोत. ज्याचे प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करते. मग तो चित्रपट अॅक्शनने भरलेला असो किंवा भावनिक असो.
महेश बाबूने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज तो त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. चाहत्यांनी देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्याच्या अभिनय आणि संवाद सादरीकरण आणि साधेपणाचे कौतुक करताना कधीच थकत नाहीत. 9 ऑगस्ट रोजी जन्मलेले महेश बाबू तेलुगु चित्रपट उद्योगातील एक दिग्गज अभिनेते आहेत.
महेश बाबूने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं आहे. प्रसिद्ध अभिनेते कृष्णा घट्टामनेनी यांचे ते पुत्र आहेत.
1999 मध्ये या चित्रपटातून महेश बाबू यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्यांना 'प्रिन्स' ही पदवी मिळाली.
महेश बाबू यांची एकूण संपत्ती सुमारे 2025 मध्ये 300 ते 350 कोटी रुपये इतकी असण्याची शक्यता आहे. त्यासोबत त्याच्याकडे प्राइवेट जेट आणि 30 कोटींचा बंगला देखील आहे.