Entertainment News : या फोटोमधील चिमुकला एकेकाळी अभिनेत्री स्मिता पाटील यांचा सेक्रेटरी होता. तर आज त्याची लहान मुलगी बॉलिवूडवर राज्य करते. मोठ्या मुलीसोबत त्याला लग्न करायचं होतं. आता तरी ओळखलं का या चिमुकल्याला?
मोठ्या मुलीसोबत लिपलॉक आणि त्यानंतर तिच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवल्यामुळे ही व्यक्ती कायम चर्चेत असते.
ओळखलं का तुम्ही या चिमुकल्याला? हे आहेत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट. आज ते त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत. महेश भट्ट यांनी चित्रपटाने धुमाकूळ घातला असला तरी त्यांच्या लव्ह लाइफ आणि मुलींसोबतच्या वक्तव्यामुळे ते कायम चर्चेत असतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार महेश भट्ट यांनी शालेय जीवनापासूनच कामाला सुरुवात केली. अर्धवेळ नोकरी करुन त्यांनी घर चालवलं.
महेश यांनी वयाच्या 20 व्या वर्षी जाहिराती लिहिण्यास सुरुवात केली. एक वेळ अशी होती जेव्हा त्यांच्या अशी वेळ आली की त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील आणि विनोद खन्ना यांचे ते सेक्रेटरी होते.
वयाच्या 26 व्या वर्षी महेश भट्ट यांनी पहिला चित्रपट बनवला आणि त्यानंतर त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली.
महेश भट्ट यांनी 'नया दौर', 'सारांश', 'अर्थ' 'लहू के दो रंग', 'दिल है की मानता नहीं' यांसारखे संवेदनशील चित्रपट करून इंडस्ट्रीत वेगळं स्थान निर्माण केलं.
त्यांचं लहानपणापासून आयुष्य संघर्षमय होतं. वडील नानाभाई भट्ट आणि आई शिरीन मोहम्मद अली हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. त्यांनी कधीच लग्न न केल्यामुळे महेश भट्ट यांना अनेक संकटाला पुढे जावं लागले.
महेश भट्ट यांचं लव्ह लाइफही अतिशय रंजक आहे. पहिलं लग्न झालं असतानाही अभिनेत्री सोनी राजदानला भेटता क्षणीच प्रेमात पडले.
सोनी राजदानला डेट केल्यानंतर पहिला पत्नीला घटस्फोट देऊन त्यांनी सोनीशी दुसरं लग्न केलं. त्यातून त्यांना दोन मुली आहेत. पण महेश भट्ट यांनी एकून चार मुलं आहेत.
महेशा भट्टचे नाव इंडस्ट्रीमधील अनेक वादांशी आणि अभिनेत्रींशी देखील जोडले गेले आहे.
महेश भट्ट आणि परवीन बाबी यांच्यातील नातेसंबंधही बॉलीवूडच्या कॉरिडॉरमध्ये बराच काळ चर्चेचा विषय होता.
त्याशिवाय रिया चक्रवर्ती, कंगना राणौत, जिया खान आणि त्यांची मुलगी पूजा भट्ट हिच्याशी नातं संबंध जोडलं गेलं.
महेश भट्ट यांचे नाव सर्वात जास्त वादात आले जेव्हा त्यांनी स्वतःची मुलगी पूजा भट्टसोबत लिपलॉक वादग्रस्त फोटोशूट केलं. एवढंच नाही तर पूजा माझी मुलगी नसती, तर मी तिच्याशी लग्न केलं असतं.
महेश भट्ट यांनी कंगना राणौतसोबत गौरवर्तन केलं असा आरोप कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने केला होता.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर महेश भट्टचे त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसोबतचे अनेक फोटो-व्हिडीओ व्हायरल झाले होते.
महेश भट्टचा रिया चक्रवर्तीसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी त्याचा दिवंगत अभिनेत्री जिया खानसोबतचा एक जुना व्हिडिओही व्हायरल झाला होता.