PHOTOS

अवघ्या 6 महिन्यांत 9600 कोटी जमा, काय आहे महिला सन्मान बचत योजना?

Mahila Samman Savings Certificate: सध्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर 7.5 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. यामध्ये किमान 1000 रुपये आणि त्यापुढील रक्कम 100 च्या पटीत गुंतवली जाऊ शकते. 

Advertisement
1/7
अवघ्या 6 महिन्यांत 9600 कोटी जमा, काय आहे महिला सन्मान बचत योजना?
अवघ्या 6 महिन्यांत 9600 कोटी जमा, काय आहे महिला सन्मान बचत योजना?

Mahila Samman Savings Certificate: महिलावर्गासाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. 

2/7
6 महिनयांचा कालावधी
6 महिनयांचा कालावधी

अवघ्या 6 महिनयांच्या कालावधीत या योजनेत 9600 कोटींहून अधिक गुंतवणूक आली आहे.

3/7
अर्थसंकल्प 2023
अर्थसंकल्प 2023

1 एप्रिल 2023 रोजी ही योजना सुरू झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये या बचत योजनेची घोषणा केली होती.

4/7
100 च्या पटीत गुंतवणूक
100 च्या पटीत गुंतवणूक

सध्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर 7.5 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. यामध्ये किमान 1000 रुपये आणि त्यापुढील रक्कम 100 च्या पटीत गुंतवली जाऊ शकते. 

5/7
2 लाख गुंतवणूक
2 लाख गुंतवणूक

या योजनेत जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. जर एखाद्या महिलेला दोन योजना उघडायच्या असतील तर त्यात किमान 3 महिन्यांचे अंतर आवश्यक आहे.

6/7
वन टाईम सेव्हिंग स्किम
वन टाईम सेव्हिंग स्किम

ही वन टाईम सेव्हिंग स्किम आहे. यामध्ये व्याजाची मोजणी तिमाही चक्रवाढ आधारावर असते. योजनेच्या शेवटी एकूण व्याज परतावा दिला जातो. या योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर 1 वर्षानंतर 40% रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे.

7/7
महत्वाच्या अटी
महत्वाच्या अटी

प्री-मॅच्युअर क्लोजरबाबत काही अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा पालकाचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केले जाऊ शकते.





Read More