देशभरात आज मकरसंक्रांतीचा सण उत्साहाने आणि विविध स्वरूपात साजरा केला जात आहे.
महाराष्ट्रात आज मकरसंक्रांंत, आसाममध्ये बिहू, तामिळनाडूमध्ये पोंगल, गुजरातमध्ये उत्तरायण या नावाने आज सण साजरा होत आहे.
आज नदीमध्ये आंघोळ करण्याची / डुबकी मारण्याची प्रथा आहे. अनेक भाविकांनी आज इलाहाबादच्या संगमावर, हरिद्वार, गढ़मुक्तेश्वर घाटावर, वाराणसीमध्ये डुबकी लावण्यासाठी गर्दी केली आहे.
मकरसंक्रांतीला उत्तरायणाला सुरूवात होते. आजपासून सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.
इलाहाबादमध्ये गंगा, यमुना, सरस्वतीच्या संगमात अनेकांनी डुबकी लावली आहे. उत्तरायणाला देवांंचा दिवस म्हणजेच सकारात्मकतेचे प्रतिक समजले जाते.
आज दान केल्यानंतर त्याच्या शंभरपट दान परत मिळते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे जप, तप, दान, स्नान, श्राद्ध, तर्पण अशा धार्मिक गोष्टींना विशेष महत्त्व असते.
आंध्रप्रदेशामध्ये पोंगल हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.
नव्या ऋतूचा, नव्या धनधान्यांंचा स्विकार करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
पोंगल या सणापासून तमिळ महिन्याची पहिली तारीख सुरू होते. या दिवशी सूर्याला प्रसाद अर्पण केला जातो.