मकर संक्रांतीनिमित्त तिळगूळ खाण्याची आणि वाटण्याची परंपरा आहे. तिळगुळ देताना म्हटलं जातं, तिळगूळ खा आणि गोड गोड बोला. पण 5 लोकांनी चुकूनही खाऊ नयेत तिळगुळाचे सेवन करु नयेत.
मकर संक्रांतीला तिळगूळाचं सेवन केलं जातं. आयुर्वैदानुसार हिवाळ्यात तिळगुळाचे सेवन हे अतिशय फायदेशीर मानलं जातं.
पौराणिक कथेनुसार सूर्यदेव जेव्हा पुत्र शनिदेवाच्या घरी आले तेव्हा शनिदेवाने सूर्यदेवाला तिळ खाण्यासाठी दिलं होतं. त्यामुळे मकर संक्रांतीला तिळ गूळ खाण्याची परंपरा आहे.
अनेकांना वेगवेगळ्या गोष्टीची ऍलर्जी असते. तुमची त्वचा ही संवेदनशील असेल तर अशा लोकांनी तिळाचं सेवन करु नयेत. या लोकांनी तीळ अतिप्रमाणात खाल्ल्यास त्वचेला खाज येते, ती लाल होते आणि बारीक पूळ येतात. त्यामुळे या लोकांनी तीळ खाऊ नयेत.
तीळ उष्ण असल्याने हिवाळ्यात खाल्ला जातो. पण ज्या लोकांना पचनाचा त्रास असेल त्यांनी जास्त प्रमाणात तीळ खाल्ल्यास पोट खराब होऊ शकतं. त्यांना जुलाब लागू शकतात. त्यामुळे या लोकांनी नावापूर्ती तिळगूळ खावे.
जर तुम्हाला पहिलेपासून केस गळतीची समस्या आहे, अशा स्थितीत तुम्ही तिळाचं सेवन केल्यास केसांच्या कूपांना कोरडे करते. त्यामुळे केस गळतीचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे या लोकांनीही तिळगूळ न खाले पाहिजे.
तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तिळगूळ हा तुमच्यासाठी नाही. कारण तिळामुळे वजन वाढण्यास मदत होते. तिळाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात फॅट आणि कॅलरीज असतात. त्यामुळे तिळाच्या अतिसेवनाने वजन वाढतं.
तीळ उष्ण असल्याने गर्भवती महिलांनी त्याच सेवन करु नयेत. तिळाचा अतिसेवनामुळे गर्भपात होण्याचा धोका असतो. त्यासोबत बाळाचा विकासावरही त्याचा परिणाम होतो.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)