PHOTOS

साखरेशिवाय बनवा चविष्ट आणि आरोग्यदायी आईस्क्रीम: 5 सोप्या रेसिपीज

उन्हाळा आला की सगळ्यांनाच थंडगार आईस्क्रीमची क्रेविंग होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आईस्क्रीम खाणं आवडतं. आपण बर्‍याचदा बाजारातून आईस्क्रीम घेऊन येतो. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, की हे चविष्ट आईस्क्रीम अनेक कृत्रिम चव आणि प्रिझर्वेटिव्ह्जने भरलेले असतात. या कृत्रिम आईस्क्रिमपेक्षा घरच्या घरीच सोप्या पद्धतीने तयार करा हेल्दी आईस्क्रिम. 

Advertisement
1/7

जर तुम्हाला हेल्दी आणि टेस्टी आईस्क्रीम खायचं असेल. तर घरच्या घरी अगदी सहजपणे आणि नैसर्गिक घटक वापरून तयार करता येते. खास म्हणजे हे आईस्क्रिम साखरेशिवाय तयार केले जाऊ शकते. आईस्क्रिममध्ये तुम्ही गोडीसाठी गूळ आणि खजूर वापरू शकता. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि त्याची चवही खास असते.

2/7

जाणून घेऊया गूळ आणि खजूर वापरून घरी बनवता येणाऱ्या 5 सोप्या आणि चवदार आईस्क्रीम रेसिपीज:

3/7
1. खजूर-बदाम आईस्क्रीम
1. खजूर-बदाम आईस्क्रीम

खजूर हे लोहाने समृद्ध असतात. तर बदाम तुमच्या शरीराला आवश्यक निरोगी फॅट्स देतात. हे आईस्क्रीम तुम्हाला फक्त थंडावा देणार नाही, तर पोषणही देईल. खजूर आणि बदाम अर्धा तास दूधात भिजवून ठेवावे. त्यानंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्यावे. तयार मिश्रण हवाबंद डब्यात भरून 6 ते 8 तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. 

4/7
2. गूळ-नारळ दूध कुल्फी
2. गूळ-नारळ दूध कुल्फी

नारळाचे दूध लॅक्टोज फ्री असते. तर गूळ शरीराला थंडावा देतो. ही कुल्फी आरोग्यदायी असून चवीलाही अप्रतिम आहे. गॅसवर मंद आचेवर नारळाचे दूध गरम करत गूळ आणि वेलची पावडर त्यात घालावी. दूध थोडं घट्ट झाल्यानंतर एका भांड्यात थंड करत ठेवा. त्यानंतर हे मिश्रण कुल्फीच्या साच्यात ओता आणि वरून सुका मेवा घालून फ्रीजमध्ये ठेवा.  

 

5/7
3. केळी-खजूर इन्स्टंट आईस्क्रीम
3. केळी-खजूर इन्स्टंट आईस्क्रीम

केळी आणि खजूर वापरून झटपट तयार होणारे आईस्क्रीम फारच टेस्टी आणि हेल्दी आहे. 2 पिकलेल्या केळ्या, 6 ते 8 खजूर, 1 चमचा पीनट बटर, दूध आणि थोडी दालचिनी मिक्सरमध्ये मिक्स करावे. हे मिश्रण तुम्ही शेक म्हणूनही सर्व्ह करू शकतात किंवा 6-7 तास फ्रीजमध्ये थंड करुन आईस्क्रिम म्हणून सर्व्ह करावे.  

 

6/7
4. गुळाचे मलाई आईस्क्रीम
4. गुळाचे मलाई आईस्क्रीम

भारतीय पारंपरिक चव असलेले हे गूळ-मलाई आईस्क्रीम खूपच स्पेशल आहे. दूध मंद आचेवर घट्ट करून थंड होऊ द्या. मग त्यात गूळ, सुका मेवा आणि वेलची घालून मिक्स करा. हे आईस्क्रिम गोठवून 6 तासांनी सर्व्ह करा.

7/7
5. खजूर-सुंठ कुल्फी
5. खजूर-सुंठ कुल्फी

कुल्फीप्रेमींसाठी ही खास रेसिपी आहे. खजूर दूधात उकळून घ्यावे. त्यानंतर दूध आणि खजूर थंड करून त्यात सुंठ पावडर आणि तीळ घालून एकत्र करावे. तयार मिश्रण साच्यात भरून 5 ते 6 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. ही कुल्फी चवदार असतेच पण शरीराची रोग प्रतिकारशक्तीही वाढवते.





Read More