PHOTOS

घरच्या-घरी 'असा' बनवा हेल्दी-टेस्टी क्विनोआ कटलेट

Healthy quinoa:  जलद वजन कमी करण्यासाठी क्विनोआ उपयुक्त मानले जाते.क्विनोआमध्ये प्रथिने आणि अमीनो अॅसिड सारखे पोषक घटक असतात. ते हाडे मजबूत करण्यासाठी काम करतात. वृद्धांसाठी याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात. त्यात मॅग्नेशियम आणि मॅंगनीज असते. हे ऑस्टियोपोरोसिस टाळण्यास मदत करतात.

Advertisement
1/7
घरच्या-घरी 'असा' बनवा हेल्दी-टेस्टी क्विनोआ कटलेट
घरच्या-घरी 'असा' बनवा हेल्दी-टेस्टी क्विनोआ कटलेट
2/7

थंडगार वातावरणामध्ये आपल्याला काहीतरी हेल्दी आणि चवदार खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण क्विनोआ कटलेटचा आहारामध्ये समावेश करू शकतो. ही रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे. यासाठी आपल्याला क्विनोआ, कांदा, सिमला मिरची, गाजर, कोबी, बेसन आणि काही मसाले लागणार आहेत. चला तर जाणून घेऊयात घरच्या-घरी हेल्दी आणि चवदार क्विनोआ कटलेट कसे तयार करायचे.

 

3/7
क्विनोआ कटलेटचे साहित्य-
क्विनोआ कटलेटचे साहित्य-

1 कप क्विनोआ,1 शिमला मिरची,1 कप किसलेली कोबी,1 गाजर, 3 चमचे बेसन, 1 टीस्पून धणे पावडर,1 चमचे तेल, 1 टीस्पून लाल तिखट, 2 चमचे कोथिंबीर ,1 कप कांदा,  आवश्यकतेनुसार मीठ

 

4/7
क्विनोआ कटलेट तयार करण्याची पध्दत-
क्विनोआ कटलेट तयार करण्याची पध्दत-

स्टेप 1- क्विनोआ 30 मिनिटे भिजत ठेवा. आता ते चांगले धुवा आणि जाड पेस्ट तयार करण्यासाठी ब्लेंडरमध्ये ठेवा. आवश्यक असल्यास, 1-2 चमचे पाणी घाला.

5/7
स्टेप 2-
स्टेप 2-

क्विनोआ पेस्ट एका भांड्यात काढा. बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, गाजर, कोबी आणि कोथिंबीर टाका. बेसन, मीठ, धणेपूड आणि लाल तिखट घाला. मिश्रण घट्ट तयार करा.

 

6/7
स्टेप 3-
स्टेप 3-

आता नॉन-स्टिक तव्यात एक चमचा तेल टाका आणि गरम होऊ द्या. मिश्रणापासून लहान टिक्की बनवा आणि पॅनमध्ये ठेवा. दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा. सर्व कटलेट्स व्यवस्थित शिजवा आणि गरमा-गरम सर्व्ह करा.

 

7/7

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

 





Read More