Diwali gifts: दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी जवळ आली असून सर्वांची उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. दिवाळीत एकमेकांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या जातात.
दिवाळीत जवळच्या व्यक्तींना भेटवस्तू दिल्याने नाते तर मजबूत होतातच त्याबरोबरच भेटवस्तू दिल्याने दिवाळी हा सण खास होतो.
दिवाळीच्या शुभ दिवशी देवी लक्ष्मीसह, शुभ भगवान गणेशाची देखील पूजा केली जाते. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना गणपतीची फोटो फ्रेम भेट देऊ शकता.
दिवाळीत घरोघरी फराळ बनवला जातो. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फराळाचे पदार्थ आणि त्यांच्या आवडीची मिठाई हॅम्पर मध्ये ठेऊन भेट देऊ शकता.
मार्केटमध्ये निरनिराळ्या प्रकारचे शो-पीस उपलब्ध आहेत. एक चांगला शो पीस देखील एक उत्तम भेटवस्तू ठरू शकतो. घराच्या सजावटीसाठी तुम्ही चांगली वस्तू खरेदी करू शकता.
अलीकडच्या काळात स्किन केअर बाबत प्रत्येक व्यक्ती प्रचंड सजग झाली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना स्किन केअर किट देऊ शकता. यामध्ये तुम्ही हिवाळाच्या दृष्टीने मॉइश्चरायझरसारखे,टोनर,क्रीम असे अनेक प्रॉडक्ट ठेऊ शकता.
आजकाल वनस्पती घरातील सजावटीच्या वस्तू म्हणून मानल्या जात आहेत. तुम्हाला जवळपास प्रत्येक घरात इनडोअर प्लांट्स पाहायला मिळतील. तुम्ही हे भेटवस्तू म्हणूनही देऊ शकता. जसे मनी प्लांट, स्नेक प्लांट आणि लकी बांबू आणि बरेचसे इनडोअर प्लांट्स आहेत.
अनेक महिलांना काचेच्या भांड्यांची प्रचंड आवड असते. अशावेळी तुम्ही डिनर सेट देऊ शकता. सध्या बाजारात विविध किंमतीमध्ये आणि आकर्षक डिझाइन्समध्ये डिनर सेट उपलब्ध आहेत. शिवाय तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता.