Homemade momos:मोमोज आजकाल लहान ते मोठे सगळ्यांनाच आवडतात. आता तर याचे अजून वेगवेगळे प्रकारही तयार केले जात आहेत. शहरात विविध ठिकाणी तुम्हाला मोमोज विकणारे स्टॉल, गाड्या आणि दुकाने दिसतील. तुम्हालाही व्हेज मोमोज खायचे असतील आणि बाहेरचे खायचे नसतील तर काही हरकत नाही. तुम्ही घरीही सहज मोमोज बनवू शकता.
घरच्या घरी बनवा हॉटेलपेक्षा भारी मोमोज... एकदम सोपी रेसिपी
आजकाल अनेकजण मोठ्या प्रमाणात फास्ट फूड खाणं पसंत करतात. तसेच लहानांपासून ते मोठ्यापर्यंत खाण्यापिण्याच्या आवडी निवडी वेगळ्या असतात. मात्र मोमोज हा पदार्थ असा आहे जो सगळ्यांनाच आवडतो. लहान मुलं देखील मोमोज खाणं खूप पसंत करतात. अशावेळी घरामध्ये बनवलेले मोमोज खाणं कधीही उत्तम ठरेल.
साबुदाणा,पनीर,गाजर,बीन्स,कोबी,तूप ,जिरे,हिरव्या मिरच्या,आलं,मीठ,-मिरपूड
आधी साबुदाणा नीट धुवून मग भिजवावा. यासाठी पाणी आणि मीठ एकत्र मिसळून मग त्यात साबुदाणा घाला. आता गाजर, शेंगदाणे आणि कोबी कमी प्रमाणात घ्या. ज्या भाज्या तुम्ही उपवासाच्या वेळी खाता त्याच भाज्या घाला. पुढीलप्रमाणे
हिरवी मिरची आणि आलं ही बारीक चिरून घ्या.आता एका कढईत तूप गरम करून मग तूपात जिरे, हिरवी मिरची आणि आले घालून परतून घ्या. आता सर्व भाज्या घालून नीट मिक्स करा. त्यात मीठ आणि मिरपूड घाला.पनीर हाताने फोडून मग थंड होऊ द्या. पुढीलप्रमाणे
आता भिजवलेले साबुदाणे चांगले मळून घ्या. मोमो बनवण्यासाठी मॅश केलेले साबुदाणे घ्या त्याची पारी बनवा आणि नंतर त्यावर सारण घाला आणि थोडे झाकून ठेवा.मग सर्व मोमोज अशा प्रकारे तयार करा. आता वाफ काढा. वाफवण्यापूर्वी बटर पेपर स्टीमरवर लावा. अशाप्रकारे मोमोज तयार आहेत.
जर तुम्ही भूक लागली आणि काही तरी हेल्दी व चविष्ट खाऊ वाटत असेल तर तुम्ही घरच्या घरी हे चवदार मोमोज बनवू शकता.