बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे चर्चेत असतात. अशाच एका अभिनेत्रीने तिचे फिटनेस सीक्रेट चाहत्यांना शेअर केले आहे. जाणून घ्या सविस्तर
बॉलिवूडच्या सुंदर आणि फिट असलेल्या अभिनेत्रींमध्ये मल्लिका शेरावतचे देखील नाव आहे. वयाच्या 48 व्या वर्षी देखील मल्लिका शेरावत खूपच सुंदर आणि तरुण दिसते.
अभिनेत्रीच्या सौंदर्य आणि फिटनेसचे कारण तिचे गुप्त फिटनेस ड्रिंक आहे. अभिनेत्रीने तिचे फिटनेस सीक्रेट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
नुकताच अभिनेत्री मल्लिका शेरावतने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून काय प्यायल्याने शरीराला नैसर्गिक एनर्जी मिळते? असा सवाल विचारला आहे.
व्हिडीओमध्ये अभिनेत्री काही तरी पिताना दिसत आहे. तसेच तिने सर्वांसोबत एक आरोग्य टीप शेअर केली आहे. ती सकाळी झोपेतून उठल्यानंतर लिंबू पाण्यात मिसळून ते पिते. कारण ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
त्यासोबतच तिने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, तुमची सकाळची सुरुवात कोमट पाणी आणि ताज्या लिंबूने करा. यामुळे तुमचे पचन सुधारते, शरीराला नैसर्गिक ऊर्जा देखील मिळते.
48 व्या वर्षी देखील मल्लिका शेरावत फिटनेसमध्ये आणि सौंदर्यामध्ये बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना टक्कर देते.
मल्लिकाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या सौंदर्याचे आणि फिटनेसचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
काही दिवसांपूर्वीच ती राजकुमार राव आणि तृप्ति डिमरी यांच्या 'विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटात दिसली होती.