Shekhar Suman Manisha Koirala Intimate Scene in Heeramandi : 'नेटफिक्स'वरील 'हिरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सिरीजमुळे यातील कलाकार सध्या खूप चर्चेत आहेत. यातील मनिषा कोईराला - शेखर सुमन यांच्यातील इंटिमेट सीन अभिनेत्रीने धक्कादाय खुलासा केलाय.
सोशल मीडियावर संजय लीला भन्साळी यांची हिरामंडी ही वेब सिरीज तुफान गाजतेय. यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहे.
या सिरीजमधील मल्लिका जानची भूमिका साकारणारी मनिषा कोईरालाच्या अभिनयाचं तोंडभरून कौतुक होतंय.
या सिरीजमधील मनिषा आणि शेखर सुमन यांच्यामधील इंटीमेट सीनबद्दल खुद्द अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केलाय.
बग्गीतील शेखर आणि मनिषामधील शारीरिक संबंधाबद्दलचं भाष्य सुरु असताना जो मल्लिकाजानशी काल्पनिक रुपात इंटीमेट सीन देतो. शेखरच्या या अभिनयाचं खूप कौतुक करण्यात येत आहे.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, ज्या सीनची एवढी चर्चा होते तो सुरुवातीला स्क्रिप्टचा भाग नव्हता, असं मनिषा कोईराला हिने स्वत: सांगितलंय.
मनिषा पुढे असंही म्हणाली की, संजय लीला भन्साळी यांना नेहमीच काहीतरी हटके आणि नवीन करायचं असतं. जेव्हा या सीनचं रिहर्सल सुरु होती तेव्हाच हा वेबस्टोरीचा भाग झाला.
मीडिया रिपोर्टनुसार शेखर सुमन या सीनबद्दल म्हणाला की त्यांनी एका टेकमध्ये अप्रतिम अभिनयाने तो पूर्ण केला.