PHOTOS

'हक्काचं शेत असताना जीमची गरज काय?' म्हणत शेतात राबतोय 'हा' मराठी अभिनेता; 1000 झाडांना...

Marathi Actor Farming: या अभिनेत्याने पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा अभिनेता आहे कोण आणि त्याने काय म्हटलंय जाणून घ्या. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

Advertisement
1/9

जर हक्काचं शेत आहे तर मग फिटनेससाठी जिममध्ये जायची गरज काय? असा सवाल करत मराठी अभिनेत्याने शेतात राबत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

 

2/9

या फोटोंमध्ये हा अभिनेता शेतातील झाडांची मशागत करताना दिसत आहे. त्यानेच एक व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

 

3/9

या अभिनेत्याने आपल्या गावाकडील शेतात काही झाडं लावली आहेत. या झाडांना खत घालतानाचे फोटो त्याने चाहत्यांसोबत शेअर केलेत. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

 

4/9

Back+ Shoulder + Bicep + Tricep + Cardio = 1000 वृक्षारोपण, अशी कॅफ्शन त्याने या फोटोंना दिली आहे. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

 

5/9

ज्या अभिनेत्याबद्दल आपण बोलतोय तो 'सुख म्हणजे नक्की काय असतं?' या मालिकेतून मल्हार म्हणून घराघरात पोहोचला आहे. बरोबर ओळखलं तुम्ही, हा अभिनेता आहे, कपिल होनराव! (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

 

6/9

कपिल सध्या त्याच्या मूळ गावी आहे. शेतात राबताना बराच व्यायाम होतो असं त्याला फोटोंमधून अधोरेखित करायचं आहे. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

 

7/9

कपिलने शेतात लावलेल्या 1 हजार झाडांना खतं देताना जी मेहनत घ्यावी लागते त्यामुळे आपोआपच शारीरिक व्यायामही होतो, असं म्हटलंय. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

 

8/9

वृक्षारोपणाच महत्व आज किती आहे हे वेगळ सांगायची गरज नाही, असं कपिलने फोटो शेअर करताना म्हटलंय. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

 

9/9

ग्लोबल वार्मिंगमुळे वृक्षारोपणाचं महत्व त्याला पटलं असल्यानेच काळजी म्हणूनही तो वृक्षारोपणाच्या कार्याला थोडासा हातभार लावताना दिसतोय. (फोटो सौजन्य – कपिल होनराव इन्स्टाग्राम)

 





Read More