Ganesh Chaturthi 2025: मराठी इंडस्ट्रीमध्ये असा एक अभिनेता आहे जो गणपती बाप्पाचा मोठा भक्त आहे. जो दरवर्षी स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती तयार करतो.
इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत जे चांगल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत असतात.
मात्र, काही कलाकार असे देखील आहेत, जे अभिनयासोबतच इतर काही गोष्टींमध्ये देखील खूप सक्रिय असतात.
असाच एक मराठी अभिनेता आहे जो कधीच गणपती बाप्पाची मूर्ती विकत घेत नाही. तर तो त्याच्या हाताने मूर्ती बनवतो.
अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता राकेश बापट हा फक्त उत्तम कलाकारच नाही तर एक कुशल मूर्तीकारदेखील आहे.
फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. दरवर्षी तो स्वतःच्या हातांनी गणपती बाप्पाची मूर्ती घडवतो. तो बाप्पाचा मोठा भक्त आहे.
राकेश बापट यंदाही आपल्या कलागुणांचा वापर करून सुंदर मूर्ती बनवणार आहे. गेल्या वर्षी त्याने मालिकेच्या सेटवर मूर्ती तयार केली होती.
यंदा राकेश बापट कोणत्या प्रकारची बाप्पाची मूर्ती तयार करणार आहे याबद्दल चाहत्यांना देखील उत्सकुता लागली आहे.
राकेश बापट आपल्या हातांनी घडवलेल्या बाप्पाची आरास, पूजा आणि आरती मनापासून करतो. यंदाचा देखील त्याचा गणेशोत्सव प्रेक्षकांसाठीही एक खास सरप्राईज ठरणार आहे.