PHOTOS

'ऑडिशन दिलं, सिलेक्ट झालो पण...', सिद्धार्थ जाधवने 'या' कारणामुळे नाकारली 'सेक्रेड गेम्स'

मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवने 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजला नकार दिला होता. आता त्याने याचा किस्सा सांगितला आहे.

Advertisement
1/9
उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान
उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान

विनोदाचं अचूक टायमिंग, स्वभावातील साधेपणाने आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर अभिनेता सिद्धार्थ जाधवने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

 

2/9
चित्रपटांमुळे तो घराघरांत लोकप्रिय
चित्रपटांमुळे तो घराघरांत लोकप्रिय

‘दे धक्का’, ‘जत्रा’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘इरादा पक्का’ अशा अनेक चित्रपटांमुळे तो घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने मराठीसह बॉलीवूड चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 

3/9
सिद्धार्थ जाधवने 'सेक्रेड गेम्स' वेबसीरिजला नकार
सिद्धार्थ जाधवने 'सेक्रेड गेम्स' वेबसीरिजला नकार

पण याच मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवने 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजला नकार दिला होता. त्याने याचा एक किस्सा सांगितला आहे.

 

4/9
मानधन खूप कमी
मानधन खूप कमी

सिद्धार्थ जाधवने 'सिद्धार्थ कनन'ला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, 'मी 'सेक्रेड गेम्स'साठी मुकेश छाब्रिया यांच्याकडे गेलो. मी ऑडिशन दिलं. अगदी सिलेक्टही झालो. पण जेव्हा मानधनाबाबतीत बोलणं सुरू झालं तेव्हा ते जे मानधन देत होते ते खूप कमी होतं.

5/9
तुला काय अडचण आहे?
तुला काय अडचण आहे?

अगदीच कमी पैसे होते. वर मला ते म्हणाले की इतर मराठी कलाकार तर इतक्या पैशात काम करतात मग तुला काय अडचण आहे? मला तेव्हा असं वाटलं की नाही यार, असं नाही चालणार.

 

6/9
आधी तुम्ही कलाकाराला आदर द्या
आधी तुम्ही कलाकाराला आदर द्या

मला वाटलं की पैसे देताय ठीक आहे, पण सगळ्यात आधी तुम्ही कलाकाराला आदर द्या. पैसा म्हणजे सगळं नाही पण आदर हवा. तुमच्या कामामुळेच तुम्हाला पुढे काम मिळतं.

7/9
भूमिका नक्कीच चांगली होती
भूमिका नक्कीच चांगली होती

मी त्यांना नकार दिला. ती भूमिका नक्कीच चांगली होती. पण पुढे ती सीरिजमधूनच काढून टाकण्यात आली. कारण वेळ वाढत होता.

8/9
नशिबात जे आहे ते मिळतंच
नशिबात जे आहे ते मिळतंच

एका अर्थी ते बरंच झालं. मी कधीही त्या गोष्टीचा पश्चाताप केला नाही. तुमच्या नशिबात जे आहे ते तुम्हाला मिळतंच. जे नशिबात नाही त्यासाठी कितीही प्रयत्न करा तुम्हाला ते मिळणारच नाही, असे सिद्धार्थ जाधव म्हणाला.

9/9
'सेक्रेड गेम्स' झळकले हे कलाकार
'सेक्रेड गेम्स' झळकले हे कलाकार

'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, राधिका आपटे, अमृता सुभाष यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या.





Read More