PHOTOS

ठाकरे बंधुंच्या पाठीशी उभे राहिले 'हे' मराठी कलाकार! पाहा 'वरळी डोम'मधील खास Photos

आज शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचा विजयी मेळावा होत आहे. मराठी भाषेसाठी तब्बल 19 वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. या मेळाव्याला अनेक दिग्गज हजेरी लावणार आहेत. 

Advertisement
1/5
ठाकरे बंधुंच्या पाठीशी उभे राहिले 'हे' मराठी कलाकार! पाहा 'वरळी डोम'मधील खास Photos
ठाकरे बंधुंच्या पाठीशी उभे राहिले 'हे' मराठी कलाकार! पाहा 'वरळी डोम'मधील खास Photos

शिवसेना-मनसेच्या मेळाव्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. या मेळाव्याला कोण कोण उपस्थित राहिले हे पाहूयात या फोटोगॅलरीच्या माध्यमातून 

2/5

मराठीतील सुपरस्टार भरत जाधव हा देखील मेळाव्यासाठी उपस्थित राहिला आहे. मराठी माणसाने एकत्र येणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता भरत जाधवने दिली आहे. 

3/5

अभिनेत्री तेजस्विनी पंडितनेदेखील या मेळाव्याला हजेरी लावली आहे. मराठीचा विजय साजरा करायला आले आहे, असं तेजस्विनी पंडित हिने म्हटलं आहे.

4/5

अभिनेता सिद्धार्थ जाधवनेदेखील विजयी मेळाव्याला पाठिंबा दिला आहे. तसंच,मराठी कलाकारांच्या मागे कायमच ठाकरे बंधू राहीले आहेत. आणि आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे, असं सिद्धार्थ जाधव म्हणाला आहे. 

5/5

लेखक, दिग्दर्शक अजित भूरे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. ऐतिहासीक सूत्रसंच्लन करावं लागणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 





Read More